ATS and Ranjangaon MIDC Police conducted a joint raid on a lodge near Pune-Nagar Highway saam tv
महाराष्ट्र

रांजणगावातील लॉजवर सुरू होता वेश्या व्यवसाय; ATS नं टाकली धाड, ७ महिला नको त्या अवस्थेत सापडल्या

ATS and Police Crack Down on Illegal Prostitution Racket: एटीएस आणि रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी पुणे-नगर महामार्गाजवळील एका लॉजवर छापा टाकला. या संयुक्त कारवाईत सात महिलांची सुटका करण्यात आली आहे.

Bharat Jadhav

  • रांजणगाव परिसरातील लॉजवर एटीएस आणि पोलिसांनी संयुक्त धाड टाकली.

  • कारवाईदरम्यान ७ पीडित महिलांची सुटका

  • एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी फरार

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील एका फर्निचर दुकानाशेजारील एका लॉजवर दहशतवाद विरोधी शाखा (ATS) व रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त छापा टाकून मोठी कारवाई केली. आज झालेल्या या कारवाईत वेश्या व्यवसायातून ७ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. त्यापैकी ३ महिला बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी लुतफ्फर मुज्जमलहक शेख (वय ४५, रा. पश्चिम बंगाल) याला अटक केली असून फरार आरोपी बबलू साहू (रा. ओडिशा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक भूषण माने व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. सुटका केलेल्या महिलांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे.

कारेगाव तालुका शिरूर हद्दीतील नगर-पुणे हायवे रोडलगतच्या एका फर्निचर दुकानाच्या बाजुला असलेल्या लॉजिंगमध्ये दहशतवादी विरोधी शाखा व रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त छापा टाकून कारवाई केली आहे. ही कारवाई भुषण माने पोलीस उपअधिक्षक, पोलीस मुख्यालय, पुणे ग्रामीण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेली आहे.

छापा कारवाईमध्ये १) लुतफ्फर मुज्जमलहक शेख वय ४५ वर्षे, मुळ रा. नालीताजल, ता. बाजीतपुर, थाना-धनियाखाली, जि.हुगली, पश्चिम बंगाल, सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे २) बबलू साहु सध्या रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे मुळ रा. उडीसा यांच्याविरुद्ध स्त्रिया आणि मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपी हे महिलांच्या असहाय्यतेच्या फायदा घेवून त्यांना देहविक्री करण्यास भाग पाडत. पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेला आरोपी लुतफ्फर शेख याला गुन्ह्याचे कामी अटक करण्यात आली आहे. आरोपी बबलू साहु हा फरार असून त्याच्याविरुध्द यापूर्वी देखील अशाच आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या छाप्याच्या कारवाईत एकूण ७ महिलांची पोलिसांनी सुटका केली असून त्यातील ३ महिला या बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पीडित महिलांना महिला सुधारगृह येथे सुरक्षेच्या दृष्टीने ठेवण्यात आलेले आहे. सदर पिडीत बांगलादेशी महिलांना कायदेशीर प्रक्रिया पुर्ण झाल्यावर परत बांग्लादेशामध्ये पाठविण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT