ATS Arrests Two Accused in Nanded Shooting Incident from Punjab Saam Tv
महाराष्ट्र

Nanded Crime: नांदेडमध्ये गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना एटीएस पथकाकडून पंजाबमध्ये अटक

Nanded City Shoot out: काही दिवसांपूर्वी नांदेड शहरात भरदिवसा गोळीबार केल्याची घटना घडली होती. त्यामुळे नांदेड शहर हे हादरले होते. या प्रकरणातील आरोपींच्या नांदेड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे.

Saam Tv

नांदेड: नांदेड: नांदेड शहरातील शहिदपुरा परिसरात १० फेब्रुवारी रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी व त्याच्या साथीदाराला महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने पंजाब राज्यातून मुसक्या आवळल्या आहे . आरोपी जगदीश ऊर्फ जग्गा आणि शुभसिंघ ऊर्फ शुभ यांना पकडण्यात आले असून, त्यांच्याविरोधात वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१० फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास शहिदपुरा भागात रवींद्रसिंघ राठोड व गुरमीतसिंघ सेवालाल उभे असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात रवींद्रसिंघ राठोड यांचा जागीच मृत्यू झाला, तर गुरमीतसिंघ सेवालाल हा गंभीर जखमी झाला. विशेष म्हणजे गुरमीतसिंघ २२ जानेवारीपासून पॅरोल रजेवर तुरुंगातून बाहेर आला होता.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. विशेष दंगा नियंत्रण पथक स्थापन करून संशयित आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होते. तपासादरम्यान गोळीबार करणाऱ्या आरोपींना मदत करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गोपनीय माहितीच्या आधारे महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने पंजाबमध्ये धडक कारवाई करत मुख्य आरोपींना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या जगदीशसिंघ याने गोळीबार केल्याची कबुली दिल्याचे समोर आले आहे. सध्या आरोपींना पंजाब न्यायालयाच्या परवानगीने लवकरच नांदेडमध्ये आणले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गुन्ह्याचा तपास जलदगतीने करण्यासाठी नांदेडसह अकोला, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील एटीएस अधिकाऱ्यांचा देखील सहभाग होता.

नांदेड पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाई मुळे शहरातील नागरिकांनी त्यांच्या पोलिसांच्या प्रती कौतुकउद्गार काढले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज ठाकरे उद्या सोलापूर दौऱ्यावर, पूरपरिस्थितीची पाहणी करणार

Navapur Police : भाजीपाला वाहतुकीच्या नावाखाली दारू तस्करी; नवापूर पोलिसांच्या कारवाईत ५ लाखांची दारू जप्त

OTT Releases: विकेंड होणार धमाकेदार, एक-दोन नाही तर तब्बल १३ वेब सिरीज आणि चित्रपट होणार प्रदर्शित

Bullet Train: गुड न्यूज! बुलेट ट्रेन नवी मुंबई एअरपोर्टला जोडणार? प्रवास आणखी सुसाट आणि आरामदायी होणार

Rajgira Puri Recipe: नवरात्रीला उपवासासाठी बनवा खास राजगिऱ्याची पुरी, रेसिपी नोट करा

SCROLL FOR NEXT