Arrest Saam Tv
महाराष्ट्र

Atpadi: मृत बाळास जन्म दिला अन् बालविवाह उघडकीस आला; देवापूरातील युवकासह ५ अटकेत

हा गुन्हा आटपाडी पोलिस ठाण्याकडे वर्ग झाला हाेता.

विजय पाटील

सांगली : मृत बाळ जन्माला आले आणि बालविवाह केल्याची धक्कादयाक घटना सांगली (sangli) जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी बालविवाह करून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पतीसह मुलीचे आई, वडील, सासू आणि सासऱ्यांवर आटपाडी (atpadi) पोलीसांनी (police) पाच जणांना अटक (arrest) केली. (sangli latest marathi news)

याबाबत पाेलिसांनी दिलेली माहिती अशी : आटपाडी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह माण तालुक्यातील देवापूर येथील समाधान चव्हाण याच्याशी २८ एप्रिल २०२१ रोजी झाला होता. मुलीची आई व वडील यांनी मुलगी अल्पवयीन असतानाही समाधान चव्हाण याच्याशी लग्न लावून दिले होते. लग्नानंतर मुलगी व तिचा पती पुणे येथे राहण्यास गेले होते. दरम्यान लग्न झाल्यानंतर अल्पवयीन असताना ही समाधान याने मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्याने मुलगी गर्भवती राहिली.

दरम्यान तिची पुणे (pune) येथील रुग्णालयात प्रसूती झाली असता बाळ मृत जन्माला आले होते. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी (bharti vidyapeeth police) मुलीची आई, वडील, पती, सासू, सासरे यांच्या विरोधात फिर्याद दिली होती. हा गुन्हा आटपाडी पोलिस ठाण्याकडे वर्ग झाला हाेता. पाेलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

जनगणनेत OBC प्रवर्ग का नाही? राहुल गांधींचा पत्रातून पंतप्रधानांना सवाल

मराठी सक्तीला भाजपचा विरोध? मराठीची सक्ती, UP निवडणुकीची भिती?

Maharashtra News Live Update: कांद्याचे भाव पाडण्याचा डाव,दिल्लीला कांदा पाठवण्यास शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध

Politics: भाजपचा 'एकला चलो'चा नारा, मित्र पक्षासोबत युती तोडली; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT