Gopichand padalkar  Saam Tv
महाराष्ट्र

Atpadi APMC Election: मतदान सुरू असताना आटपाटीत राडा; आमदार गोपीचंद पडळकरांची ग्रा.पं. सदस्यास मारहाण

Gopichand Padalkar News: पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत, शांततेचं आवाहन केलं. सध्या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

विजय पाटील

Atpadi Bazar Samiti Election News: राज्यात बाजार समिती निवडणूकीची (APMC) रणधुमाळी सुरू आहे. याच निवडणूकीदरम्यान आटपाडीमध्ये राडा झाल्याचे समोर आले आहे. आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या मतदानावेळी भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर व काळेवाडी गावातील एका सदस्यांमध्ये झालेल्या वादावादीमध्ये आमदार पडळकर यांनी काळेवाडी ग्रामपंचायत सदस्य मंगेश सस्ते यास मारहाण करण्याचा प्रकार घडला समोर आला आहे. (Latest Marathi News)

आटपाडी (Atpadi) कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी चुरशीनं मतदान सुरू आहे. सत्ताधारी भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी आघाडीच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस, रासप यांच्यात कमालीचा संघर्ष होताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) विधानपरिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी एका ग्राम पंचायत सदस्याच्या कानशिलात लगावल्याचे समोर आले आहे.

मतदान केंद्रावर सकाळपासून रांगा लागल्या होत्या. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी 12 वाजेपर्यंत 70 टक्के मतदान झालं. तत्पूर्वी 11 वाजण्याच्या सुमारास दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली.

दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधी गटातील काळेवाडी ग्रामपंचायत सदस्य (Gram Panchayat Member) मंगेश सस्ते यांना थप्पड लगावली. या प्रकारानंतर वातावरण तणावपूर्ण आहे. मात्र, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत, शांततेचं आवाहन केलं. सध्या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Maharashtra Politcs)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission :...नाही तर माफी मागावी लागेल; निवडणूक आयोगाची राहुल गांधींना ७ दिवसांची डेडलाईन

१७ व्या वर्षी वेश्याव्यवसाय, दुबईच्या बारमध्ये नाचली; दिग्दर्शकामुळे झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Shah rukh Khan: रिटायरमेंटचा सल्ला दिला, किंग खानने दिलं असं झणझणीत उत्तर की ट्रोलरची बोलतीच बंद!

Maharashtra Live News Update: विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी आज अमरावतीत

Duplicate Voter: एका मतदाराचं नाव दोन-दोन ठिकाणी कशी? मृतांचा आकडा वाढला कसा? आयोगानं सांगितली कारणं

SCROLL FOR NEXT