Beed विनोद जिरे
महाराष्ट्र

पिकविम्यासाठी जिल्ह्यातील विविध मागण्यांसंदर्भात शेतकरी पुत्रांचा आसूड मोर्चा

पिकविम्याचा प्रश्न 10 दिवसात मार्गी लावा, अन्यथा शेताच्या बांधावर करणार उपोषण

विनोद जिरे

बीड: बीडमध्ये पिकविम्यासह शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागण्यासाठी, शेतकरी (Farmers) पुत्रांसह शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज शेतकरी नेते धनंजय गुंदेकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी आसूड घेऊन रस्त्यावर उतरत मोर्चा काढला आहे. यावेळी बीड (Beed) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून निघालेला हा मोर्चा नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर (Collector Office) धडकला आहे.

हे देखील पाहा-

यावेळी 2020 आणि 21 चा हजारो शेतकऱ्यांचा रखडलेला पिक विमा तात्काळ द्यावा, रखडलेले अतिवृष्टी अनुदान देण्यात यावे, शेती क्षेत्राला पूर्णवेळ वीजपुरवठा देण्यात यावा. यासह विविध मागण्यांसाठी आज शेतकरी पुत्रांसह शेतकरी आक्रमक झाले आहेत. दरम्यान येणाऱ्या 10 दिवसांमध्ये पीकविम्याचा प्रश्न जर मार्गी लावला नाही, तर गावखेड्यातील 10 हजार शेतकऱ्यांसह थेट शेतीच्या (Agriculture) बांधावर उपोषण करु, असा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एका पिंपळाच्या झाडाच्या पुनर्वसनाच्या प्रेरणेतून सांगलीत घडली हरित चळवळ: आमदार सुहास बाबर

Nashik Firing: हिरावाडीतील ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार, परिसरात भीतीचं वातावरण

Kalyan Crime: गार्डनमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीवर जीवघेणा हल्ला, ४ ते ५ जणांनी मारहाण करत डोक्यात दारूच्या बाटल्या फोडल्या

Maharashtra News Live Update: नाशिकच्या हिरावाडी परिसरात ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार

Supreme Court: शेअरिंग कार, २ दिवस व्हर्च्युअल हेरिंग; इंधन बचतीच्या आवाहानानंतर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT