Ajit pawar And devendra Fadnavis
Ajit pawar And devendra Fadnavis  saam tv
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस- अजित पवार भविष्यात एकत्र येतील का ? ज्योतिषी म्हणाले...

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाठी आजचा दिवस विशेष आहे. कारण आज दोघांचा वाढदिवस आहे. दोघेही महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज राजकीय नेते आहेत. २०१९ साली संपूर्ण महाराष्ट्र गाढ झोपी असताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राज्यपालांच्या साक्षीनं हातमिळवणी करत सरकार स्थापन केलं होतं. या दोन्ही नेत्यांचा वर्ग प्रचंड मोठा आहे. भविष्यात या दोन्ही नेत्यापैकी कोणाचे अच्छे दिन येतील का, फडणवीस-अजित पवारांची पत्रिका काय सांगते ? हे दोन्ही भविष्यात एकत्र येणार का ? याचा वेध ज्योतिषांनी घेतला आहे. (Devendra Fadnavis and Ajit Pawar News In Marathi )

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस राज्यातील प्रमुख नेते आहेत. दोन्ही नेते विरोधी पक्षात असूनही त्यांच्यात बरंच साम्य आहे. या दोन्ही अभ्यासू नेत्यांनी राज्याच्या राजकारणात महत्वाचं स्थान निर्माण केलं आहे. या दोन्ही नेत्यांवर भाष्य करताना ज्योतिषी राजकुमार शर्मा म्हणाले, 'देवेंद्र फडवणीस यांच्या कुंडलीचा अभ्यास करतो तेव्हा, त्यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी सकाळी १० वाजून २९ मिनिटांनी झाला. त्यांची रास कुंभ आहे. अजित पवार यांच्या कुंडलीचा अभ्यास करतो, तेव्हा त्यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी झाला, त्यांच्या जन्माचा इतका फरक आहे. देवेंद्र हे अजित पवारांहून लहान आहेत. त्यात अजित पवांरांची रास देखील कुंभ आहे. या दोघांनी सरकार स्थापन केलं, मात्र ते अयशस्वी झाले. त्यामागे त्यांची कुंभ रास आहे'.

'कारण एक राशीमध्ये संबंध जुळत नाही. त्यामुळे त्यांचं सरकार दुसऱ्यादिवशी कोसळलं. फडणवीसांना केतूची महादशा ४ मार्च २०१९ रोजी लागली. त्यामुळे फडणवीस सरकार हे अधिक काळ टिकले नाही. अजित पवारामागे बुध की महादशा लागली आहे. दरम्यान, मी याआधी महाविकास आघाडी कोसळणार असल्याचं भाकीत व्यक्त केलं होतं. त्यामुळे दोन्ही पुन्हा सरकार स्थापन करणार नाही. त्यामुळे दोन्ही नेत्यांची मैत्री चांगली असू शकते. मात्र, दोघेही २०२८ सालानंतर राज्यात सरकार स्थापन करू शकतील, असे ते पुढे म्हणाले.

नाशिकचे ज्योतिषी नरेंद्र धारणे म्हणाले, 'दोघांच्या जन्मतारखा या जन्म तारखेनुसार सारख्या आहेत. तसेच दोघांच्या राशी सारख्या आहेत. २०२८ पर्यंत दोन्ही नेते एकत्र येणार नाही, असं बोलणं उचित ठरणार नाही. दोघ्यांच्या कुंडलीत मुख्यमंत्री होण्याचे योग आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात. तसेच अजित पवार देखील मुख्यमंत्री होऊ शकतात. त्यामुळे २०२८ नंतर दोघे एकत्र येतील, याला काही आधार नाही. राजकीय परिस्थिती बदलली तर दोघे एकत्र येऊ शकतील'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut | कशाचा शोध घेतायत संजय राऊत?

Avinash Jadhav: खंडणीच्या आरोपानंतर अविनाश जाधवांची पहिली प्रतिक्रिया

Raveena Tandon: रविनाचा हवाहवाई लूक; पाहा फोटो..

Prakash Ambedkar Pune | प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान!

Today's Marathi News Live: अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT