Beed News Saam Tv
महाराष्ट्र

समाज कल्याणमधील अनागोंदी कारभार भोवला; प्रभारी सहाय्यक आयुक्त सचिन मडावी निलंबित

अनियमितता केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

विनोद जिरे

बीड - राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याच बीड (Beed) जिल्ह्यात समाजकल्याणमध्ये अनागोंदी कारभार सुरू असल्याचे वारंवार समोर आलेले आहे. जिल्ह्यात अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत अनियमितता करणे बीडचे समाज कल्याणचे प्रभारी सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांना चांगलेच भोवले आहे. त्यांच्यावर अनियमितता केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

हे देखील पाहा -

बीड जिल्ह्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती उपयोजनेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य अजय सरवदे यांनी केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने प्रादेशिक आयुक्तांनी औरंगाबादचे प्रादेशिक उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशीचे आदेश दिले होते.

या चौकशीत डॉ. सचिन मडावी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अनियमितता केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. विभागाचे अवर सचिव डी.आर.डिंगळे यांनी हे निलंबनाचे आदेश काढले आहेत. दरम्यान यामुळं प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली असून राजकीय वरदहस्त असल्यामुळे कारवाई होण्यास विलंब झाल्याचा, आरोप तक्रारदार अजय सरवदे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dasara Melava: महाराष्ट्रात आज ५ दसरा मेळावे, कधी आणि कुठे कोण बोलणार? ठाकरे आणि शिंदेंकडे राज्याचे लक्ष

Shani Gochar: 27 वर्षांनी शनी करणार गुरुच्या घरात प्रवेश; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Maharashtra Live News Update : राज्यात आज ५ दसरा मेळावे! ठाकरे-शिंदेंच्या भाषणांकडे सर्वांच्या नजरा; जरांगे काय बोलणार?

Thane Municipal Corporation : ठाणे महापालिकेत ACBचा छापा; कार्यलायात उपायुक्तांची चौकशी सुरु

Dussehra Melava: दसरा मेळावा कुणाचा किती कोटींचा? दसरा मेळाव्यावरून पेटलं राजकारण

SCROLL FOR NEXT