Maharastra Politics  Saam tv
महाराष्ट्र

Nilesh Rane: महायुतीत जागांची आदलाबदली होणार? निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार?

Assembly Election: जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने कु्डाळ मतदारसंघात मोठी उलटफेर होण्याची शक्यता आहे. भाजप आमदार थेट पक्ष बदल करणार आहे. कोण आहेत हे नेते? कोणत्या पक्षात करणार प्रवेश?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटला नाही. त्यातच शिंदे गट आणि भाजपने कोकण जिंकण्यासाठी विशेष योजना आखलीय.यामध्ये निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्याची नेमकी काय कारणं आहेत? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याने महायुतीत राजकीय घडामोडींना वेग आलाय.. त्यातच कुडाळ मालवणची जागा शिंदेंच्या शिवसेनेची असल्याने भाजप नेते निलेश राणेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेत धनुष्यबाण हाती घेण्याचे संकेत दिलेत. तर निलेश राणेंनी शिंदे गटात प्रवेश केल्यास शिंदे गट त्यांचं काम करणार असल्याचं उदय सामंतांनी याआधीच स्पष्ट केलंय.

2014 मध्ये वैभव नाईकांनी नारायण राणेंना पराभूत केलं. त्यानंतर 2019 मध्ये शिवसेनेच्या वैभव नाईकांनी अपक्ष रणजित देसाईंना पराभूत केलं. नेमकं मतांचं समीकरण कसं होतं? पाहूया.

2019 चं कुडाळ विधानसभेचं गणित?

वैभव नाईक, आमदार, ठाकरे गट

69168

रणजित देसाई, अपक्ष

54819

15 हजार मतांनी नाईकांचा विजय

महायुतीत 35 जागांवर तिढा कायम असतानाच भाजपने 99 उमेदवारांची यादी जाहीर केलीय. या यादीत कणकवलीतून नितेश राणेंना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. मात्र कुडाळची जागा शिंदे गटाकडे असल्याने आणि कोणत्याही परिस्थितीत कोकण राखण्यासाठी उमेदवार स्वाईप करण्याची रणनीती महायुतीने आखलीय.. मात्र आता निलेश राणे शिंदे गटात प्रवेश करून 2014 मध्ये वैभव नाईकांनी नारायण राणेंच्या केलेल्या पराभवाचा वचपा काढणार का? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT