NCP Ajit Pawar Group On Daund Seat Free Press journal
महाराष्ट्र

Assembly Election: दौंडच्या जागेसाठी भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच; कूल यांच्या जागेवर अजित पवार गटाचा दावा

NCP Ajit Pawar Group On Daund Seat: दौंडच्या जागेवरून महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाने थेट भाजपच्या जागेवर दावा केलाय.

Bharat Jadhav

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

एका बाजुला महायुतीमध्ये जागावाटपाची बैठका होत असतांनाच जागांवर तिन्ही पक्षांकडून दावे केले जात आहेत. जागांवर केले जाणाऱ्या दाव्यांमुळे महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. आपल्याच पक्षाला जागा मिळावी यासाठी तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये चढाओढ लागलीय. भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केल्याने भाजप आणि अजित पवार गटात वाद होण्याची शक्यता आहे.

दौंड विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी, अशी मागणी दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी केलीय.वीरधवल जगदाळे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. दौंडच्या जागेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे जगदाळे यांनी मागणी केलीय. दौंडची जागा सध्या भाजपकडे आहे. भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या जागेवरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केल्याने दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

बारामतीमधून सुनेत्रा पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी याची पहिली मागणी वीरधवल जगदाळे यांनी केली होती. ही मागणी मान्य देखील झाली होती. त्यानंतर जगदाळे यांनी आता दौंड विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी अशी मागणी केली. त्यात ते अजित पवार याचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे त्यांची ही मागणी देखील मान्य केली जाईल का हे पाहावे लागेल.

सध्या महायुतीमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला काय असावा यासाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची शनिवारी पहिली बैठक झाली. या चर्चेत अजित पवारांनी दौंड विधानसभेवर दावा करावा, अशी मागणी वीरधवल जगदाळे यांनी केलीय. दौंड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेच्या नेत्यांची कामे आहेत. घराघरात राष्ट्रवादी पक्षाला पोहोचवण्याचं काम येथील पदाधिकाऱ्यांनी केलंय.

सरकारने नुकतीच सुरू केलेली लाडकी बहीण योजनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तसेच अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी दिलीय. त्यामुळे जनेत्या मनात सकारात्मकता आहे. त्यामुळे या जागेवर दावा करण्यात यावा अशी मागणी वीरधवल जगदाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि जिल्हाध्यक्षांकडे केलीय.

महायुतीत वाद होण्याचा विषय नाहीच आहे, लोकसभा निवडणुकीच्या वेळीदेखील आम्ही बारामती जागेची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. ही मागणी पक्षश्रेष्ठींनी मान्यही केली होती. त्यामुळे ही मागणी मान्य होईल. परंतु जागेसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार पक्षश्रेष्ठींकडे आहे, ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असं जगदाळे यांनी महायुतीच्या वादासंदर्भात म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky zodiac signs: शनिवारी कार्तिक चतुर्थी! व्यवहार, चर्चा आणि निर्णयांसाठी अनुकूल दिवस; 4 राशींवर विशेष कृपा

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

SCROLL FOR NEXT