CM Eknath Shinde  Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana News: यादी जाहीर होताच शिंदे गटात पहिली बंडखोरी! 'लाडकी बहीण' अपक्ष लढणार; संजय गायकवाडांविरोधात मैदानात उतरणार

Maharashtra Assembly Election 2024: संजय गायकवाड यांच्या उमेदवारीनंतर आता शिवसेना शिंदे गटामध्ये बंडखोरीचे वारे वाहत आहेत. संजय गायकवाड यांच्या उमेदवारीनंतर प्रेमलता सोनवणे यांनी अपक्ष लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Gangappa Pujari

संजय गायकवाड, बुलढाणा

Buldhana Assembly Election 2024: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ४५ जणांच्या या उमेदवारी यादीत शिवसेनेतील बंडानंतर शिंदेंसोबत गेलेल्या अनेक विद्यमान आमदारांचा समावेश आहे. तसेच यामध्ये बुलढाण्यातून संजय गायकवाड यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. संजय गायकवाड यांच्या उमेदवारीनंतर आता शिवसेना शिंदे गटामध्ये बंडखोरीचे वारे वाहत आहेत. संजय गायकवाड यांच्या उमेदवारीनंतर प्रेमलता सोनवणे यांनी अपक्ष लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर बुलढाण्यात पहिला बंडाचा झेंडा फडकला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४५ उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर केली. या यादीमध्ये संजय गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आल्याने शिंदे गटाच्या महिला उमेदवार प्रेमलता सोनवणे यांनी बंडखोरी करण्याचे संकेत दिले आहेत. जिजाऊंच्या जिल्ह्यात महिलांचा अपमान झाल्याची प्रतिक्रिया प्रेमलता सोनवणे यांनी व्यक्त केली असून त्या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या वर्षभरापासून प्रेमलता सोनवणे यांनी बुलढाण्यातून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली होती. निवडणुकांच्या दृष्टीने त्यांनी मतदारसंघामध्ये जनसंपर्क वाढवला होता. शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळण्याची त्यांना अपेक्षा होती. मात्र कालच्या यादीत त्यांचे नाव न आल्याने आता अपक्ष लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बुलढाण्यामध्ये जोरदार सामना होणार असल्याचे दिसत आहे.

कोण आहेत प्रेमलता सोनवणे?

प्रेमलता सोनवणे यांनी अनेक आंदोलनाचे नेतृत्व करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मागील नागपूर अधिवेशनादरम्यान त्यांनी केलेले मुंडन आंदोलन प्रचंड चर्चेत आले होते. बुलढाणा मतदार संघ बुलढाणा आणि मोताळा अशा दोन तालुक्यांमध्ये आहे. यापैकी मोताळा तालुक्यात प्रेमलता सोनवणे यांचे वर्चस्व आहे. त्यांना मराठा समाजाचाही मोठा पाठिंबा पाहायला मिळत आहे. त्यामुळे बुलढाण्यामध्ये चुरशीची लढत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samosa Recipe: घरच्या घरी नाश्त्याला बनवा खुसखुशीत समोसा; बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे द्याल सोडून

Maharashtra Politcs : निकालाच्या आदल्या दिवशी भाजपला मोठा धक्का; मुंबईतील बड्या नेत्याने हाती धरली उद्धव ठाकरेंची मशाल

Night Jasmine: घराच्या बागेत लावा पारिजातकाचं झाड, मनमोहक सुगंधाने बहरेल तुमची बाग

Saam Exit Poll : सावंत की पडळकर? मतदारांचा कौल कुणाला, पाहा एक्झिट पोल VIDEO

Arjuni Morgaon Exit Poll : अर्जुनी मोरगाव मतदारसंघात कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT