Surabhi Jayashree Jagdish
कोकण किनारपट्टीवरील वेंगुर्ला गाव त्याच्या स्वच्छ समुद्रकिनारे, हिरवीगार वनराई आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते.
पावसाळ्यात वेंगुर्ल्याचे सौंदर्य अधिकच खुलते, कारण सर्वत्र हिरवळ पसरते आणि हवामान आल्हाददायक होते.
वेंगुर्ल्याला अनेक सुंदर आणि शांत किनारे आहेत, जसे की मोचेमाड बीच, दाभोली बीच , आणि शिमगोळ बीच प्रसिद्ध आहेत.
वेंगुर्ल्याच्या टोकावर असलेलं हे लाईटफाऊस एक सुंदर ठिकाण आहे. इथून अरबी समुद्राचे आणि आजूबाजूच्या किनारपट्टीचे विहंगम दृश्य दिसतं.
वेंगुर्ल्यापासून जवळच असलेल्या रेडी गावात हे प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. इथे सापडलेली स्वयंभू गणपतीची मूर्ती खूप मोठी आणि आकर्षक आहे.
रेडी गणपती मंदिराच्या जवळच हा ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला पोर्तुगीज आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा साक्षीदार आहे.
वेंगुर्ला हे एक जुने आणि ऐतिहासिक बंदर आहे. इथे मासेमारीच्या बोटी आणि स्थानिक जीवनशैली पाहायला मिळते.