Sharad Pawar, Uddhav Thackeray, Nana Patole Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मविआच्या नाराजीनाट्यावर पडदा! काँग्रेसचा 'हा' नेता वाद मिटवणार, शरद पवार- ठाकरेंशी चर्चा करणार

Maharashtra Assembly Election 2024: नाना पटोले यांच्याविरोधात ठाकरे गटाने घेतलेल्या भूमिकेमुळे आता बाळासाहेब थोरात हे काँग्रेसकडून शरद पवार गट तसेच उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहेत.

Gangappa Pujari

वैदेही कानेकर, मुंबई

Maharashtra Assembly Election 2024: एकीकडे विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असतानाच महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य सुरु आहे. जागा वाटपाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार घमासान सुरु असून वाद मिटवण्यासाठी थेट दिल्ली हायकमांडने मध्यस्थी केली आहे. नाना पटोले यांच्याविरोधात ठाकरे गटाने घेतलेल्या भूमिकेमुळे आता बाळासाहेब थोरात हे काँग्रेसकडून शरद पवार गट तसेच उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत मविआच्या नाराजी नाट्यावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाचे ५३ उमेदवार ठरले!

शिवसेना ठाकरे गटाकडून ५३ उमेदवारांना ग्रीन सिग्नल देण्यात आल्याची महत्वाची अपडेट समोर आली आहे.गुरुवारपासून विद्यमान आमदार तसेच इच्छुक उमेदवारांनी मातोश्रीवर येऊन भेटी घेतल्या. त्यानंतर तिढा नसलेल्या जागावर संबंधित उमेदवाराला लढण्यासंदर्भात तयारीचे आदेश मातोश्रीवरून देण्यात आले आहेत. तसेच ठाकरे गट महाविकास आघाडीमध्ये 96 टे 98 जागा लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

त्यापैकी 86 जागावरील इच्छुक उमेदवारांची यादी ठाकरे गटाकडून निश्चित करण्यात आली आहे. 86 मतदार संघातील ज्या मतदार संघात एकापेक्षा जास्त इच्छुक आहेत त्यांचा सर्वे करून उमेदवारांना मातोश्रीवर बोलवण्यात येत असून त्यांना सूचना दिल्या जात आहेत. अशा पद्धतीने एकूण आतापर्यंत 53 जणांना उमेदवारी निश्चितीबद्दल सूचना देण्यात आल्या आहेत.

हडपसर विधानसभेवरुन मविआत रस्सीखेच

महाविकास आघाडी मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे हडपसर विधानसभा मतदार संघातून इच्छुक आहेत. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महादेव बाबर इच्छुक आहेत. दोघांनीही आपली मोर्चेबांधणी केलेली आहे. अशातच हडपसर विधानसभेची जागा शिवसेनेलाच मिळावी यासाठी माजी आमदार महादेव बाबर पदाधिकाऱ्यांसह मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. आज ते मातोश्रीवर उद्धव ठाकरेंसह संजय राऊत यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता काय निर्णय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lonavala-Khandala Tourism: 'या' विकेंडला मस्त भिजायचंय? लोणावळा-खंडाळ्यातील 'या' धबधब्यांची नाव आताच नोट करा

Shefali Jariwala Property: शेफाली जरीवालाची एकूण संपत्ती किती? वारसदार कोण?

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

SCROLL FOR NEXT