सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यामधील मिरजेत एका सराईत गुंडाची निर्घृण हत्या (murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिरजेतील (Miraj) २ जणांनी अवघ्या २०० रुपयाकरिता गळ्यावर लोखंडी सळईने घाव घालून हत्या केली आहे. ही घटना मृत गुंडाच्या पत्नीच्या डोळ्यासमोरच घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासामध्येच पोलिसांनी (police) दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळले (arrested) आहेत. आरोपींना न्यायालयामध्ये (court) हजर केले असताना न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे देखील पहा-
आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. योगेश हणमंत शिंदे असे हत्या झालेल्या २८ वर्षीय युवकाचे नाव आहे. तो मूळचा इचलकरंजी (Ichalkaranji) येथील रहिवासी असून तो २ हत्येच्या गुन्ह्यांमध्ये मुख्य संशयित आरोपी (Accused) आहे. पण ४ महिन्याअगोदर तुरुंगातून पॅरोलवर सुटल्यानंतर तो फरार झाला होता. मागील काही दिवसांपासून तो मिरजेत आपल्या पत्नीसह वास्तव्याला होता. तर सलीम ग्यासुद्दीन सय्यद आणि प्रकाश अनिल पवार असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. दोन्ही आरोपी मिरजेतील रहिवासी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत योगेश शिंदे पॅरोलवर सुटल्यावर तो फरार होऊन मिरजेतील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता. वेटरचे काम करत असताना तो आरोपी सलीम सय्यद आणि प्रकाश पवार यांच्याबरोबर रेल्वे स्थानक परिसरात गोळ्या बिस्कीट पॅकिंग करून ते विक्रीचे काम देखील करत होता. घटनेच्या दिवशी सोमवारी रात्री तिघेजण एकत्र बसून दारू प्यायले होते. दारू पिल्यावर आरोपींनी हिशोबातील २०० रुपये योगेशकडे मागितले होते. तिन्ही आरोपी दारूच्या नशेत असल्याने त्यामध्ये पैशावरून वाद वाढत गेला.
यावेळी यागेशने 'मी २ खून केले आहेत, तुम्हालाही संपवून टाकीन' अशी धमकी देत होता. यावेळी बाहेरचा कोणीतरी मिरजेमध्ये येऊन आपल्याला धमकी देतोय, हे बघून आरोपी सय्यद आणि पवार यांना राग अनावर झाला. या कारणामधून आरोपींनी बाजूला पडलेल्या सळईने योगेशच्या गळ्यावर जोरदार हल्ला केला आहे. हा हल्ला इतका भयानक होता की योगेशचा जागीच मृत्यू झाला आहे. ही सर्व घटना योगेशच्या पत्नीच्या डोळ्याच्या समोर झाले आहे. या घटनेनंतर योगेशच्या पत्नीने पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासामध्ये दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.