Jalna Crime: कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांवर खंजीर आणि चाकूने भीषण हल्ला, दोन पोलिस गंभीर!

खादगाव शिवारात घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात आता पोलिस देखील सुरक्षित नसल्याची धक्कादायक बाब सामोर आली
Jalna Crime: कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांवर खंजीर आणि चाकूने भीषण हल्ला, दोन पोलिस गंभीर!
Jalna Crime: कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांवर खंजीर आणि चाकूने भीषण हल्ला, दोन पोलिस गंभीर! लक्ष्मण सोळुंखे
Published On

जालना : जालन्यात वर्दीवर असलेल्या दोन पोलिस (Police) हेड कॉन्स्टेबल वर खंजीर आणि चाकूने (Knife) हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने जिल्ह्यात (district) एकच खळबळ उडाली आहे. रात्रीच्या सुमारास खादगाव (Khadgaon) शिवारात घडलेल्या या घटनेने जिल्ह्यात आता पोलिस (Police) देखील सुरक्षित नसल्याची धक्कादायक बाब सामोर आली आहे.

चंदणझिरा (Chandanjhira) पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खादगाव शिवारात असलेल्या सिद्धार्थ ऑइल मिलमध्ये २ इसम हुज्जत घालत असल्याची माहिती ऑइल मिल (Oil mill) व्यवस्थापनाने पोलिसांना कळवले होते. ही माहिती मिळताच चंदणझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांनी यांनी हेड कॉन्स्टेबल (Constable) वेताळ आणि प्रभाकर वाघ या २ पोलिस कर्मचाऱ्यांना (employees) कारवाईसाठी पाठविण्यात आले होते.

हे देखील पहा-

त्यावेळेस वर्दीवर असलेले पोलिस मिल परिसरात येताच हुज्जत घालणाऱ्या पप्पू घोरपडे आणि नवनाथ नाईकवाडे यांनी पोलिसाच्या अंगावर धाव घेत, पोलिस कर्मचारी वेताळ यांच्या छातीवर आणि वाघ यांच्या हातावर धारदार खंजीर आणि चाकूने हल्ला चढविला आहे. या हल्ल्यामध्ये दोन्ही पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याने त्यांना जालना (Jalna) शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये (hospital) दाखल करण्यात आले आहे.

Jalna Crime: कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांवर खंजीर आणि चाकूने भीषण हल्ला, दोन पोलिस गंभीर!
Jharkhand Accident: भीषण अपघात! बस- ट्रकच्या धडकेत 10 जण जागीच ठार

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांनी दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून चंदणझिरा पोलिस ठाण्यात हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीचा शोध घेतला जात आहे. वर्दीवर असलेल्या पोलिसावरच हल्ला झाल्याने जिल्ह्यात पोलिस देखील सुरक्षित नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com