Sangli News Saam TV
महाराष्ट्र

Sangli News: सांगली ग्रामपंचायत निवडणूकीचा अर्ज भरण्याच्या वादातून इच्छुक उमेदवाराचे अपहरण

यातील चार आरोपींपैकी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Sangli News: सांगली (Sangli) ग्रामपंचायत निवडणूकीचा अर्ज भरण्याच्या वादातून एका इच्छुक उमेदवाराचे अपहरण करण्यात आले. अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर त्यांनी तरुणाला सोडून दिले. खानापूरच्या बेणापूर विठ्ठलनगर येथे ही घटना घडली आहे. यातील चार आरोपींपैकी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, उदय आनंदराव भोसले वय ३८ असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. १ डिसेंबर रोजी तो खानापूर येथील यश कॉम्प्युटर सेंटरमध्ये गेला होता. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. निवडणूकीच्या वादावारून पत्नी छायाला आपल्या पतीचे अपहरण झाले असावे असा संशय आला. तिने लगेच विटा पोलीस (Police) स्टेशनला धाव घेतली.

प्रताप करचे उर्फ गब्बर या व्यक्तीनेच आपल्या पतीचे अपहरण केल्याचा तिला संशय असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. या प्रकरणाचा तपास सुरू असताना अपहरणाच्या तिसऱ्या दिवशी तरुण उदय भोसले खानापूर पोलीस क्षेत्रात आला. त्यावेळी त्याचा पोलीसांनी जबाब नोंदवून घेतला.

उदयने जबाबात सांगितले की, १ डिसेंबर रोजी बेणापूर ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज आॅनलाईन भरण्यासाठी मी खानापूर येथील कॉम्प्युटर सेंटरमध्ये गेलो होतो. यावेळी गब्बर उर्फ प्रताप करचे आणि त्याच्या साथीदारांनी दुचाकीवरून माझे अपहरण केले. त्यानंतर त्यांनी मला ओमनी मोटारीतून टेंभूर्णी, मोडनिंब परिसरात नेले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर त्यांनी सोडून दिल्यावर मी पोलीस स्टेशनला आलो.

बेणापूर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी अर्ज भरू नये, यासाठी चौघांनी अपहरण केल्याचे उदयने पोलिसांना सांगितल्यावर त्यांनी लगेचच तपासाचा वेग वाढवला. याप्रकरणी पोलीसांनी गोरख माने व गोविंद महानवर या दोघांना अटक केली असून मुख्य संशयित गब्बर करचे आणि मिथून घाडगे हे दोघेजण फरार आहेत. या घटनेत वापरलेली ओमनी कार देखील पोलीसांनी जप्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: तिसऱ्या फेरीनंतर नाशिमधल्या कोणत्या मतदारसंघात काय स्थिती?

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: सुरूवातीचे कल महायुतीकडे, १५४ जागांवर आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

SCROLL FOR NEXT