Nashik Accident Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Accident: नाशकात डांबर वाहणारा ट्रक उलटून एक अपघात, गरम डांबराखाली दबून कर्मचारी भाजला

नाशकात डांबर वाहणारा ट्रक उलटून एक अपघात झाला आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक : नाशकात डांबर वाहणारा ट्रक उलटून एक अपघात झाला आहे. या अपघातात डांबराखाली दबून एक कर्मचारी गंभीररित्या जखमी झाला आहे. सध्या जखमी कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं?

नाशिक (Nashik) शहरातील एमजी रोड परिसरात एक डांबर वाहणारा ट्रक (Truck) उलटून अपघात घडला आहे. या अपघातात ट्रक उलटल्यानंतर ट्रकमधील गरम डांबर रस्त्याच्या कडेला पसरले. या गरम डांबराखाली दबून एक कर्मचारी गंभीर रित्या भाजला आहे.

स्थानिकांच्या मदतीने जखमी (Injured) कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गॅस पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेले रस्ते बुझवताना ही घटना घडल्याची माहिती आहे. रस्त्यातील खड्डे व्यवस्थित न बुझवल्याने त्यातच निकृष्ट कामात डांबराच्या ट्रकचे चाक अडकून ट्रक पलटी झाल्याची माहिती आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought: राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर, वाचा

5 Chutney Recipe: कोणत्याही पदार्थासोबत खाता येतील अशा 5 सोप्या चटणी रेसिपी

Maharashtra News Live Update : पुण्यातील तिसऱ्या मानाच्या गणपतीचं विसर्जन

WhatsApp नंबर बदलताय? 'या' ५ चुका अजिबात करू नका; नाहीतर कायमचा गमावाल तुमचा महत्त्वाचा डेटा

October 2026 Rules : एलपीजी सिलेंडरपासून युपीआयपर्यंत, १ ऑक्टोबरपासून ५ मोठे नियम बदलणार; थेट तुमच्या बजेटवर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT