खरातच्या मोबाईलमध्ये २५०० कोडवर्ड आढळले
व्हीआयपी कनेक्शनचा संशय आहे
एसआयटीकडून सखोल तपास सुरू आहे
मोबाईल डेटा रिकव्हरी प्रक्रिया सुरू असून यामुळे अनेक व्हीआयपींचे धाबे दणाणले
आता खरातच्या मोबाईलने हजार राजकीय नेते, शासकीय अधिकारी आणि बडे उद्योजकांचं टेन्शन वाढवलंय. कारण त्यात अडीच हजार कोडवर्ड आढळून आलेत.नेमकं या कोडवर्डमध्ये नेमकं काय आहे? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
तंत्रमंत्राच्या नावाखाली सुरु असलेल्या खरातच्या वासनेच्या बाजाराचा भांडाफोड झाला आणि पोलीस तपासाची सुत्रं वेगाने फिरली. आता तर खरातच्या मोबाईलमधून महाराष्ट्राला हादरवणारे धागेदोरे समोर आलेत. तब्बल अडीच हजारांपेक्षा जास्त फोन नंबर हे कोडवर्डनं सेव्ह केल्याचं समोर आलय. त्यामुळे या तपासाचं गूढ अधिकच वाढलंय. आणि आता तर हे कोडवर्ड पोलिसांच्या हाती लागल्यानं हजारो व्हीआयपींचे धाबं दणाणलं आहेत.
खरातच्या मोबाईलमध्ये VIP व्यक्तींची नावं कोडवर्डमध्ये सेव्ह केल्याचा संशय आहे. तर पीडित महिलांचे नंबर मात्र जाणून बुजून मुख्य मोबाईलमध्ये सेव्ह न करण्यची काळजी खरातनं घेतलीय. पीडितांशी संपर्क साधण्यासाठी खरात वेगळ्या मोबाईलचा वापर करायचा. त्या फोनचं सिमकार्डही खरातच्या नावावर नसल्याची माहिती सुत्रांनी दिलीय..
दुसरीकडे एसआयटीचे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात खरातच्या मोबाईलसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केलाय. खरातचे 2 मोबाईल जप्त केले असून त्याच्या डेटाची रिकव्हरी सुरु आहे. विशेष गोष्ट म्हणजे खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधवच्याही मोबाईलची चौकशी करण्यात येणार आहे. त्याबरोबरच खरात आणि नीरज जाधवचे नंबर एकमेकांशी जोडले आहेत का? याचंही कनेक्शन तपासण्यात येणार आहे.
खरातच्या मोबाईलमध्ये आढळून आलेले अडीच हजार कोडवर्डने सेव्ह केलेल्या नंबरमधून खरातचं राजकीय कनेक्शनही उघड होणार आहे. त्यामुळे खरातने कोडवर्डने सेव्ह केलेल्या नंबरमागचं गूढ उलगडल्यास हजारो व्हीआयपी अडकणार, हे मात्र निश्चित. त्यामुळे हा निष्पक्ष तपास व्हायला हवा. आणि खरातच्या काळ्या कारनाम्याला साथ देणाऱ्यांचाही भांडाफोड व्हायला हवी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.