Ashok Chavan saam tv
महाराष्ट्र

Nanded: संजय बियाणींच्या पत्नीचा पाेलिसांवर राेष; मारेक-यांना पकडू : अशाेक चव्हाण

संजय बियाणी यांच्या हत्येच्या निषेर्धात आज व्यापा-यांनी नांदेड बंदचे आवाहन केले आहे.

संतोष जोशी

नांदेड : संजय बियाणी (sanjay biyaani) हे दानशूर व्यक्तीमत्व हाेतं. त्यांची निर्दयीपणे झालेली हत्या ही धक्कादायक असून नांदेडच्या (nanded) इतिहासात असं कधीच घडली नव्हते. बियाणी यांच्या कुटुंबियांनी केलेल्या मागणीनूसार निश्चितच या घटनेचा तपास अतिशय बारकाईनं केला जाईल अशी ग्वाही काॅंग्रेसचे (congress) ज्येष्ठ नेते पालकमंत्री अशाेक चव्हाण (ashok chavan) यांनी माध्यमांशी बाेलताना दिली.

नांदेड येथे बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची मंगळवारी हत्या झाली. आज बियाणी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी आणि परिवाराचे सांत्वन करण्यासाठी मंत्री चव्हाण हे बियाणींच्या निवासस्थानी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना गुन्हेगारांना तातडीने पकडण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांची (nanded police) बैठक घेणार असल्याचे नमूद केले.

मंत्री चव्हाण म्हणाले गेल्या आठ दिवसांपुर्वी मी त्यांच्या कार्यक्रमाला गेलाे हाेताे. अतिशय शांत व मनमिळावू स्वभावाचा संजय हाेता. त्यांच्या हत्येचा तपास हा वेगाने हाेईल याची ग्वाही देताे. आजच दुपारी पाेलिस खात्याची बैठक घेणार आहे. दरम्यान नांदेडच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी ही घटना असल्याची खंत देखील मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

नागरिक आक्रमक

दरम्यान संजय बियाणी यांच्या निवासस्थाना समोर आज नागरिकांनी मोठी गर्दी करत पोलिस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. हत्या करणाऱ्या आरोपींना तातडीने पकडा अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. तसेच व्यापारी संघटनांनी नांदेड कडकडीत बंद ठेवत हल्ल्याचा निषेध नाेंदविला आहे.

बियाणींच्या पत्नीचा आक्राेश

संजय बियाणी यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पत्नीनं केलेला आक्रोशानंतर सर्वच उपस्थित हळहळे. दरम्यान बियाणींच्या पत्नीने कायदा व सुव्यवस्थेवर थेट आरोप करत कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Death : तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

पुण्यात काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात; खासगी रुग्णालयात उपचार सुरू

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी लागणार! आठव्या वेतन आयोगात पगारवाढीचा फॉर्म्युला बदलणार?

Maharashtra News Live Update: आसाममध्ये सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे भव्य स्वागत

Maharashtra Government : पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारनं घेतले ३ मोठे निर्णय, अधिकार्‍यांच्या दौऱ्यावर बंदी अन्...

SCROLL FOR NEXT