Maharashtra Congress, ashok chavan, balasaheb thorat  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Congress : महाराष्ट्र काॅंग्रेस चिंतेत... बाळासाहेब थाेरातांच्या राजीनाम्यानंतर अशाेक चव्हाण म्हणतात आम्ही...

आज सकाळपासून महाराष्ट्रातील काॅंग्रेस नेत्यांमध्ये चलबिचल दिसून येत आहे.

लक्ष्मण सोळुंके

Maharashtra Congress : काँग्रेस नेते (congress leader) आणि माजी आमदार आशिष देशमुख (ashish deshmukh) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची पदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. देशमुख यांनी पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना पत्र लिहून राज्यातील काॅंग्रेस पक्षाची स्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. दरम्यान कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला. वाढदिनीच थाेरातांनी राजीनामा दिल्याने कॉंग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Maharashtra Congress Party News Today)

बाळासाहेब थाेरात यांनी राजीनामा दिल्याने काॅंग्रेसचे जूने जाणते नेते देखील दुखावले गेले आहेत. माजी मुख्यमंत्री अशाेक चव्हाण (ashok chavan) यांनी ही दुर्दैवी बाब असल्याचे म्हटलं आहे. जालना येथे एका विवाह साेहळ्यासाठी आलेल्या चव्हाणांनी माध्यमांनी थाेरातांच्या राजीनामाबाबत (Balasaheb Thorat Resignation) छेडले असता त्यांनी तुमच्याकडून (पत्रकार) याची माहिती मिळत आहे. हे खरं असेल तर ही बाब दुर्देवी आहे.

चव्हाण म्हणाले आज बाळासाहेबांचा वाढदिवस आहे. त्यांना आज सकाळीच मी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. काँग्रेसपक्ष (maharashtra congress) वाढीसाठी आणि हा वाद मिटवण्यासाठी मी त्यांची मनधरणी करीन असेही चव्हाण यांनी नमूद केले. थोरात हे पक्ष सोडून जाणार नाहीच असंही चव्हाण यांनी नमूद केले.

दरम्यान आशिष देशमुख यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या काळात नाना पटाेले यांच्या हकालपट्टी करा अशी मागणी करत पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणला हाेता. त्याचे पडसाद निवडणुकीच्या निकालानंतर समाेर येऊ लागले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident : ट्रक उलटला, आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली, व्हिडिओ पाहून डोक्याला हात माराल

Pawar vs Pawar : 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत, मतदानाच्या दिवशीच रोहित पवारांचे संकेत

आरोग्य यंत्रणेचा 'डेड रिपोर्ट'! 108 नंबरला क़ॉल, अ‍ॅम्ब्युलन्स 40 मिनिट लेट, रुग्णाचा मृत्यू

Bhandara Accident : लग्न लावून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; ५ ठार, २ गंभीर

आमदार गायकवाडांच्या गुंडगिरीला पुन्हा ऊत, पानसरेंच्या पुस्तकावरून गायकवाडांची 'बॉक्सिंग'

SCROLL FOR NEXT