Holi : होळी सणा निमित्त कोकणात (Konkan Holi) जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने (MSRTC) नियमित बसेस (msrtc bus) व्यतिरिक्त २५० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ०३ मार्च ते १२ मार्च २०२३ दरम्यान या गाड्या कोकणातील मार्गावरून धावतील अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (msrtc vice president shekhar channe) यांनी दिली.
गणेशोत्सवाबरोबरच होळीचा सणही (holi festival) कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबईहून (mumbai) लाखो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जात असतात. त्यामुळे या सणाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. (Maharashtra News)
या प्रवाशांची (passengers) गैरसोय होऊ नये यासाठी एसटी सज्ज झाली आहे. यंदा महामंडळाने २५० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल (mumbai central), परळ (parel), कुर्ला (kurla), बोरिवली (borivali), ठाणे (thane), वसई (vasai), नालासोपारा (nalasopara) तसेच पनवेल येथील बसस्थानकांतून खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली (kankavli), सावंतवाडी (sawantwadi), मालवण (malvan) आदी भागात या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
आगाऊ आरक्षणासाठी एसटी महामंडळाच्या (https://msrtc.maharashtra.gov.in) या अधिकृत संकेतस्थळा बरोबरच (Msrtc Mobile Reservation App) याचाही प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.