Accident News saam tv
महाराष्ट्र

Parbhani News: सासरी पत्नीस भेटण्यासाठी जाणा-या युवकाचा जिंतूर - जालना महामार्गावरील अपघातात मृत्यू; सेलूत शाेककळा

अपघात घडल्यानंतर युवकाच्या मोबाईलवर अनेकांचे फोन येत होते.

राजेश काटकर

Parbhani Selu News: जिंतूर - जालना महामार्गावर (jintur-jalna highway) बाळंतपणासाठी माहेरी गेलेल्या पत्नीस (wife) भेटीस जाणाऱ्या पतीचा (husband) दुचाकीच्या अपघातात (accident) मृत्यू झाला. अशोक रावसाहेब अंभुरे (ashok ambhuare) असे या मयत युवकाचे (youth) नाव आहे. अंभुरे हे सेलू (selu) येथील एका शाळेच्या (school) वाहनावर चालक म्हणून कार्यरत हाेते.

ही घटना परभणीच्या जिंतूर- जालना महामार्गावरील चारठाणा येथील पेट्रोल पंपाजवळ घडली. या घटनेची माहिती मिळतात चारठाणा येथील सरपंच आणि नागरिकांनी अशोक अंभुरे यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. मात्र, ते अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याने जिंतूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले होते या ठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आले.

सेलू येथील अंभुरे हे दुचाकीवरून सेलू येथून जिंतूर तालुक्यातील केहाळ येथे बाळंतपणासाठी माहेरी गेलेल्या पत्नीस भेटण्यासाठी जात होते. दरम्यान, चारठाणा गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या अपघातात त्यांच्या डोक्यास व छातीस गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्राव अधिक झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.

अशोक रावसाहेब अंभुरे यांच्या पश्चात पत्नी व एक दोन वर्षाचा मुलगा आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबियांवर माेठं संकट काेसळलं आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : काँग्रेसच्या आंदोलनावर किरेन रिजिजू यांची टीका; म्हणाले, ‘काँग्रेस दिशाहीन’

Red Saree Designs For Women: महिलांसाठी लाल साड्यांच्या सुंदर डिझाईन्स, 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत १२ जणांना अटक

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

SCROLL FOR NEXT