Ashish Shear and Uddhav Thackeray  Saam Tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray Vs Devendra Fadnavis : ...हे फडतूस उद्योग कुणी केले उध्दवजी?, फडणवीसांवरील टीकेनंतर शेलार संतापले

Mumbai Latest News : उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजपच्या नेत्यांनी ट्वीटरवरुन उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News: ठाण्यातील ठाकरे गटाच्या (Thackeray Group) महिला पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshani Shinde) यांना माराहण केल्याप्रकरणी शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला. तसंच, राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला.

यावेळी देवेंद्र फडणवीस हे फडतूस गृहमंत्री असल्याची टीक करत उद्धव ठाकरेंनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजपच्या नेत्यांनी ट्वीटरवरुन उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. आशिष शेलार यांनी ट्वीट करत असे लिहिले आहे की, 'आमचे गृहमंत्री "फडतूस" नाही "काडतूस" आहेत! मागील अडीच वर्षात ठाकरे सरकारचा फडतूस कारभार महाराष्ट्राने पाहिला. कोणत्याही मारहाणीचे समर्थ होत नाही, आम्ही ते करणारही नाही. पण या अशा खुनशी कारभाराची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात माननिय उध्दव ठाकरे यांनीच रोवली.', अशी टीका त्यांनी केली.

आशिष शेलार यांनी आणखी एक ट्वीट करत याद्वारे ठाकरे सरकारच्या काळामध्ये घडलेल्या घटनांचा पाढाच वाचून दाखवला आहे. त्यांनी असे लिहिले आहे की, 'निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांचा डोळा फोडण्यापासून, पत्रकारांना घरात घुसून अटक करण्यापर्यंत, लोकांची घरे तोडणे, खोटे गुन्हे दाखल करणे, केंद्रीय मंत्र्यांना अटक करणे...हे फडतूस उद्योग कुणी केले उध्दवजी? आम्ही त्याचवेळी हे सांगत होतो की कद्रु मनाने फडतूस कारभाराचे जनक होऊ नका!', असे ट्वीट करत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांनाच सवाल केला आहे.

तर दुसरीकडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे . त्यांनी ट्वीट करत असे लिहिले की,'देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना तोंड सांभाळून बोला उद्धव ठाकरेजी! अडीच वर्षांत तुमची फडतूस कामगिरी महाराष्ट्रातील जनतेने पाहिली आहे. पालघर साधू हत्याकांड ते 100 कोटी वसुली प्रकरणात तुम्ही काय केलं हे जनता विसरली नाही.', असा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

Edited By - Priya Vijay More

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Tests: हार्ट अटॅकची भीती वाटतेय? मग आत्ताच करा या 2 टेस्ट, डॉक्टरांनी सांगितली महत्वाची माहिती

Dam Water Level: पुणेकरांची चिंता वाढली! पवना धरणात २४ टक्के पाणी, इतर धरणांची स्थिती काय? ताजी आकडेवारी आली समोर

Maharashtra News Live Update: दिल्लीत हॉटेलमध्ये भीषण आग, आतापर्यंत 21 जणांचा होरपळून मृत्यू

लग्न करण्याचं वय काय? मुला आणि मुलींचे वय वेगवेगळे असते का?

Stomach cancer symptoms: शरीरात हे 4 बदल दिसले तर समजा पोटाचा कॅन्सर झालाय, लक्षणं ओळखणं फारच कठीण

SCROLL FOR NEXT