Ashish Shelar Saam TV
महाराष्ट्र

Ashish Shelar : किंचित आणि वंचित; दरोडेखोराकडून मुंबई वाचवणं गरजेचं; शेलारांचा ठाकरे आणि वंचितच्या युतीवर घणाघात

त्यांनी दारोडेखोर, बिल्डर आणि त्यांच्या माणसांचे पैसै माफ केलेत, असे आरोप आशिष शेलार यांनी केले आहेत.

Ruchika Jadhav

Ashish Shelar : आगामी महापालिका निवडणुकांसाठी आता विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर टीका आणि आरोप प्रत्यारोप करत आहेत. उध्दव ठाकरे हे एखाद्या शेठजी प्रमाणे आहेत. त्यांनी दारोडेखोर, बिल्डर आणि त्यांच्या माणसांचे पैसै माफ केलेत, असे आरोप आशिष शेलार यांनी केले आहेत. (Latest Ashish Shelar News)

काल बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली होती. त्यावरून आता आशिष शेलारांनी ठाकरेसह वंचित बहुजन आघाडीवर देखील हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी संवाद साधत असताना आज शेलारांनी किंचित आणि वंचित एकत्र आले, अशा शब्दांत शिवसेमा आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची खिल्ली आमदार ॲड. आशिष शेलार उडवली आहे.

शेलार पुढे म्हणाले की, " कुणीतरी खरंच म्हटलं आहे किंचित आणि वंचित एकत्र आले आहेत हे सुध्दा त्यांचे लिव्ह इन रिलेशन आहे. आमच्या भीतीपोटी त्यांची पळापळ होते आहे हे स्पष्ट दिसत आहे म्हणून उद्धव ठाकरे मराठी मुस्लिम करत मुस्लिमांच्या मागे लागतात. मग कधी वंचितच्या मागे लागतात. आमच्या भीतीने होणारी पळापळ म्हणजे किंचित आणि वंचित यांची आघाडी आहे."

उद्धव ठाकरे का आले नाही?

शेलारांनी पुढे राऊतांवर देखील निशाना साधला. यावेळी ते म्हणाले की, " मुख्यमंत्र्यांना इंग्लिश येते का माहित नाही पण संजय राऊत यांना English येतं का? उद्धव ठाकरे इंग्लिश बोलू शकतात का? दावोसमध्ये गुंतवणूक पाहून आता कोणीही काही बोलू लागले आहे. कालचा कार्यक्रम अराजकीय आहे. सगळे होते पण उद्धव ठाकरे आले नहीत. पण भगव्या वस्त्रातील बाळासाहेबांच्या तैलचित्रामुळे काही मतांच्या लांगुलचालनासाठी ते आले नाहीत."

" उद्धवजी सारख्या शेठजीनी त्यांचा लोकांना फायदा करण्यासाठीं ईतके वर्षे महापालिका चालवली. अपयशी नेता म्हणुन उध्दव ठाकरे यांना ओळखलं जातं. स्वतःच पक्ष आणि आमदार एकत्र ठेवू शकले नाही. मुंबईकरांनी यांना ओळखलं आहे. दरोडेखोराकडून मुंबई वाचवणं गरजेच आहे, त्यामुळें यावेळी भाजपला मुंबईकर संधी देतील.", अशी बोचकी टीका आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Metro News : पुणेकरांसाठी खुशखबर! मेट्रो टप्पा-2 ला हिरवा कंदील, उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Sewri Fort History: मुंबईतील 'या' किल्ल्याला लाभलाय ऐतिहासिक वारसा; एकदा आवर्जून भेट द्याच

Maharashtra Live News Update: डबल स्टार असलेल्या मतदारांना मतदान करता येणार नाही- निवडणूक आयोग

Gopichand Hinduja Dies: उद्योगजगताला मोठा धक्का! गोपीचंद हिंदुजा यांचं निधन; वयाच्या ८५ व्या घेतला लंडनमध्ये अखेरचा श्वास

Election 2025: दुबार मतदारांना झटका, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; नेमकं काय पाऊल उचललं?

SCROLL FOR NEXT