Ashadhi Wari 2023 Saamtv
महाराष्ट्र

Ashadhi Wari 2023: यळकोट यळकोट; जय मल्हार! भंडाऱ्याची उधळण करत माऊलींची पालखी जेजुरीत दाखल

Ashadhi Ekadashi Palakhi Sohla 2023: संत तुकाराम महाराजांची पालखी आज वरवंड येथे मुक्कामी असणार आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचा आज जेजुरीत मुक्काम असणार आहे.

Gangappa Pujari

Dnyaneshwar Mauli Palakhi In Jejuri: यळकोट यळकोट जयमल्हारचा जयघोष करत आणि भंडाऱ्याची उधळण करत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे जेजुरी नगरीत आगमन झाले. यावेळी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम आणि यळकोट यळकोट जय मल्हारचा करत जेजुरीकरांनी मोठ्या भक्तिभावाने पालखीचे स्वागत केले. आज पालखीचा जेजुरी नगरीत मुक्काम असणार आहे. (Ashadhi Wari Location Update)

सासवडहून सकाळी पंढरपुरकडे निघालेला ज्ञानेश्वर माऊलींच्या (Dnyaneshwar Mauli) पालखीचा मेळा जेजुरीजवळ आला. यावेळी लांबूनच खंडोबाचा गड दिसू लागताच वारकर्‍यांच्या आनंदाला उधाण आले. दिंड्यांमधील वारकर्‍यांच्या टाळ-मृदुंगाचा आवाज वाढला. विठूनामाच्या गजराबरोबरच ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असा जयघोष सुरु झाला.

यावेळी अठरापगड जातींचं श्रद्धास्थान असलेला खंडोबा व पंढरीचा विठोबा या दैवतांच्या भक्तिरसात सारे जण न्हाऊन निघाले होते. मोठ्या जल्लोशात जेजुरी नगरीत माऊलींचे स्वागत झाले. यावेळी संपूर्ण जेजुरीकर वारकऱ्यांच्या सेवेत दाखल झाले होते. गावामध्ये विविध संस्था, मंडळांच्या वतीने वारकरी बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. (Ashadhi Wari 2023)

माऊलींच्या स्वागतासाठी खंडोबाची जेजुरी (Jejuri) सजली होती. पालखी येताच रस्त्यांच्या दोन्ही बाजुंनी भंडाऱ्यांची उधळण करण्यात आली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम सोबतच यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष करण्यात आला. दरम्यान, संत तुकाराम महाराजांची पालखी आज वरवंड येथे मुक्कामी असणार आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचा आज जेजुरीत मुक्काम असणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT