ऐन आषढी वारीत पंढरपुरातील सुरक्षा रक्षकाची मुजोरी समोर आलीय. लाडक्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे असलेल्या महिला भाविकाला सुरक्षा रक्षकाने धक्काबुक्की केल्याची घटना घडलीय. दर्शन रांगेत असलेल्या भाविक महिला आणि पुरुषाला सुरक्षा रक्षकाने धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
सध्या आषाढी एकादशीला विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पंढरपुरात झालीय. साधारण एक लाख भाविक दर्शन रांगेत आहेत. या भाविकांच्या सुरक्षेसाठी एका सुरक्षा एजन्सीकडे सुरक्षा रक्षक पुरवण्याची जबाबदारी देण्यात आलीय. या एजन्सीमधील एका रक्षकाने भाविकांसोबत हुज्जत घालत त्यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडलीय. या घटनेमुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून सुरक्षा रक्षकावर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान भाविकांची गर्दी लाखोंच्या संख्येने असल्याने मंदिर समितीकडून काही अर्नथ घडू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आपत्कालीन व्यवस्था तयार करण्यात आली. विठ्ठल मंदिरातील बाजीराव पडसाळी हा परिसर आपत्कालीन व्यवस्थेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. यामुळे आषाढी यात्रेच्या अनुषंगाने भाविकांची होणाऱ्या गर्दीत काही गोंधळ निर्माण झाल्यास या आपत्कालीन व्यवस्थेचा उपयोग करता येईल.
येत्या १७ जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. याच दरम्यान विठ्ठल मंदिरामध्ये देखील दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना चांगले दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर समितीने चोख तयारी केली आहे. विठ्ठलाचे दर्शन करता यावे, यासाठी अतिरिक्त बससेवा सुरू करण्यात आलीय. आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवाशी येतात. यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून देण्यात आलीय.
४० पेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्रवासातदेखील प्रवाशांना सवलतीचा लाभ मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.