Ashadhi Ekadashi 2023 Manache Warkari Saam TV
महाराष्ट्र

Ashadhi Ekadashi 2023: सलग २५ वर्षांपासून पायी वारी, आता मिळाला विठ्ठलाच्या महापूजेचा मान; जाणून घ्या कोण आहे काळे दाम्पत्य

Ashadhi Ekadashi 2023 Manache Warkari: यंदाच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान अहमनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातल्या वाकडी येथील काळे दाम्पत्याला मिळाला.

Satish Daud

Ashadhi Ekadashi 2023 Manache Warkari: यंदाच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान अहमनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातल्या वाकडी येथील काळे दाम्पत्याला मिळाला. भाऊसाहेब काळे आणि त्यांच्या पत्नी मंगल काळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknnath Shinde) यांच्यासोबत शासकीय महापूजा केली. काळे दाम्पत्य गेल्या २५ वर्षांपासून आषाढीची पायी वारी करीत आहे.

शासकीय महापूजेचा मान मिळाल्यानंतर काळे दाम्पत्याला गहिवरून आले होते. आज एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे (Ashadhi Ekadashi 2023) दर्शन व्हावे यासाठी ते सकाळी सहा वाजता रांगेत उभा राहिले होते. असा महापूजेचा मान मिळेल असे कधी वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया भाऊसाहेब काळे आणि त्यांच्या पत्नी मंगल काळे यांनी दिली.

सर्व कर्ता करविता तो पांडुरंग आहे. आज आमच्या जीवनाचे सार्थक झाले, आम्ही धन्य झालो, असंही काळे दाम्पत्य म्हणाले. नेवासा (Ahmednagar) तालुक्यातील वाकडी या छोट्याशा गावात राहणारे काळे दाम्पत्य शेती करतात. त्यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत, असा परिवार आहे. आमच्या घरात गेल्या अनेक वर्षांपासून लहान थोर एकादशीचा उपवास करतात. आम्ही देवगड संस्थांनच्या दिंडीतून पायी वारी करतो, असे मानाच्या वारकऱ्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली. यावेळी एकनाथ शिंदेंसोबत त्यांच्या पत्नी, लता एकनाथ शिंदेही उपस्थित होत्या. तसेच, त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेही सपत्नीक उपस्थित होते. या महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी विठुरायाला साकडे घातले.

'बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना चांगले दिवस येऊ देत. राज्यात पाऊस चांगला पडू दे. राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, असे मागणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विठ्ठलाच्या चरणी मागितले.यावेळी विठुरायाच्या नामाने अवघे पंढरपूर दुमदुमून गेले होते. दरम्यान, महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

SCROLL FOR NEXT