उज्वल निकम SaamTvNews विजय पाटील
महाराष्ट्र

Aryan Khan ड्रग्ज प्रकरणी कोणीही माध्यमांसमोर चमकोगिरी करू नये : ऍड. उज्वल निकम

राजकीय नेत्यांनी तपास यंत्रणेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले तर कायदा व सुव्यवस्थेला धोका आहे. असे मत विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी व्यक्त केले, ते सांगली मध्ये बोलत होते

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी राजकीय नेत्यांनी प्रसारमाध्यमांसमोर चमकोगिरी करू नये, कोणीतीही निवेदने देऊन सोशल मीडियावर प्रसिद्ध केली जात आहेत. राजकीय नेत्यांनी तपास यंत्रणेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले तर कायदा व सुव्यवस्थेला धोका आहे. असे मत विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी व्यक्त केले, ते सांगली मध्ये बोलत होते.

हे देखील पहा :

राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्या तपास यंत्रणांवर काही मते व्यक्त केली जात आहेत तपास यंत्रणानी तपास करताना संयम बाळगला पाहिजे. तर कोणीही चमकोगिरीसाठी म्हणून वाट्टेल तशी निवेदने देणे किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करणे टाळावे. राजकीय नेत्यांनी तपास यंत्रणेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले तर कायद्या व सुव्यवस्थेला धोका आहे. नेत्यांनी अश्या प्रकरणात न्यायालयात दाद मागावी. जनतेच्या मनात शंका निर्माण केल्या जात आहेत, हे योग्य नसल्याचेही निकम म्हणाले.

गुन्हा घडताच कामा नये आणि लोकांना न्यायालयात जावेच लागू नये हे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य स्तुत्य आहे. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या वक्तव्याचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी कौतुक केले आहे..पण मनुष्यस्वभावाप्रमाणे आपल्या मनासारखे झाले नाही तर याची दाद कुठे मागायची हा देखील महत्वाचा भाग असून त्यासाठी न्यायालये आहेत. मात्र, न्यायालयात अकारण कुणाला त्रास, बदला घेण्याच्या हेतूने कायदेशीर कारवाई होऊ नये हाच यामागे मुख्यमंत्र्यांचा उदात्त हेतू असावा असे निकम यांनी म्हटले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT