Artificial Paneer Ban Saam Tv
महाराष्ट्र

Paneer: पनीर खाणाऱ्यांनो सावधान, सरकारने घेतला मोठा निर्णय; हॉटेलवाल्यांवर होणार कारवाई

Artificial Paneer Ban: राज्य सरकारनंतर केंद्र सरकारने आर्टिफिशियल पनीरवर बंदी घातली आहे. असे पनीर विकणाऱ्या हॉटेल आणि रेस्टॉरंटवर कारवाई केली जाणार आहे. सरकारने थेट आदेश दिले आहेत.

Priya More

Summary -

  • पनीरच्या नावाखाली बनावट पदार्थ विक्रीवर कारवाई

  • १ मेपासून नवीन नियमांची अंमलबजावणी

  • मेनू कार्डमध्ये स्पष्ट उल्लेख बंधनकारक

  • ग्राहकांची फसवणूक रोखण्यावर सरकारचा भर

गणेश कवडे, मुंबई

महाराष्ट्रानंतर आता केंद्र सरकारने ‘आर्टिफिशियल पनीर’ म्हणजेच चीज अनॅलॉगवर मोठा निर्णय घेतला आहे. फुड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथोरिटी ऑफ इंडियाच्या (FSSAI) नियमांनुसार हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये पनीरच्या नावाखाली स्वस्त पर्याय विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. १ मेपासून या नियमांची अंमलबजावणी होणार असून ग्राहकांची फसवणूक रोखण्यावर भर दिला जाणार आहे.

पनीर म्हणून चीज अनॅलॉग अर्थात आर्टिफिशियल पनीर विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या आदेशानंतर केंद्र शासनाकडून देखील अंमलबजावणीचे आदेश दिले. भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी ही माहिती दिली. देशातील हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरर्स, फास्ट फूड चालकांना केंद्र सरकारने याबाबत आदेश दिले. एफएसएसएआयकडून कारवाईसाठी परिपत्रक जारी करण्यात आले.

विधीमंडळ अधिवेशनात विक्रमसिंह पाचपुते यांनी आर्टिफिशियल पनीरचा मुद्दा मांडला होता. १ मे पासून पनीर ऐवजी चीज अनॅलॉग म्हणून मेनू कार्डमध्ये बदल करावा लागणार आहे. मेनू कार्डमध्ये बदल न केल्यास एफडीए आणि एफएसएसएआयकडून कारवाई केली जाणार आहे. नागरिकांना देखील पनीर खाताना ते आर्टिफिशियल पनीरसारखे लागले तर त्यांनी तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन केले जात आहे.

पनीर आणि चीज अनॅलॉगमध्ये फरक काय?

- पनीर फक्त दूध फाडून बनवले जाते. चीज अनॅलॉगमध्ये पाम तेल, स्टार्च आणि दुधाचे घन पदार्थ वापरले जातात.

- पनीरमध्ये उच्च दर्जाचे प्रोटीन आणि कॅल्शियम असते.

- चीज अनॅलॉगमध्ये प्रथिने कमी आणि अनहेल्दी फॅट्स जास्त असतात.

- खरे पनीर मऊ आणि सहज तुटणारे असते.

- चीज अनॅलॉग रबरासारखे, चिवट आणि थोडे तेलकट असते.

- चीज अनॅलॉग हे खऱ्या पनीरच्या तुलनेत खूप स्वस्त असते

- चीज अनॅलॉग १५० ते २१० रुपये किलो दराने मिळते. तर पनीरचा दर ३५० ते ४०० रुपये किलो आहे.

- वनस्पती तेल आणि दूध किंवा दुधाची भुकटी एकत्र करून तयार होणाऱ्या चीज अ‍ॅनालॉगचा पनीर म्हणून आहारात समावेश केला जातो.

- चीज अनॅलॉग खाल्ल्याने मेद वाढणे, कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यासह पचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात.

- पनीरऐवजी पर्यायी पदार्थ म्हणून चीज अनॅलॉग वापरणे ही एका अर्थाने ग्राहकांची फसणवूक आहे.

- लहान मुलांना पनीर अतिशय आवडत असल्याने त्यांच्या आणि इतरांच्याही आरोग्याशी हा खेळ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT