Siddhi Hande
नाश्त्याला रोज काय बनवावं असा प्रश्न पडलेला असतो.गृहिणींना असा पदार्थ बनवायचा असतो जो पौष्टिकही असेल अन् चटपटीतदेखील.
तुम्ही घरी पौष्टिक आणि चटपटीत पनीर चिला बनवू शकतात. ही रेसिपी खूप कमी वेळात तयार होते.
किसलेले पनीर, गव्हाचे पीठ, कांदा, कोथिंबीर, मीठ, जिरे, ओवा, गरम मसाला, मिरची पावडर, तेल किंवा तूप
सर्वात आधी तुम्हाला एका बाउलमध्ये किसलेले पनीर घ्यायचे आहे.
यामध्ये बारीक चिरलेला कांदा,कोथिंबीर, जिरे, ओवा, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि मीठ घाला.
यानंतर सर्व मिश्रण एकत्र एकजीव करुन घ्या. यात गव्हाचे पीठ किंवा बेसनाचे पीठ टाकून त्यात पाणी टाका.
या मिश्रणाचे बॅटर बनवायचे आहे.हे बॅटर जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नसावे.
यानंतर नॉन स्टिक पॅनवर तेल किंवा तूप टाका. त्यावर हे बॅटर गोलाकार आकारात पसरवून घ्या.
यानंतर दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या.