Manasvi Choudhary
उन्हाळ्यात गर्मीपासून आराम मिळवण्यासाठी थंडगार सरबत पितात. लिंबू पाणी उन्हाळ्यात शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. लिंबू पाणी शरीराला हायड्रेट ठेवते, फ्रेश वाटते.
शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन केले जाते.
लिंबू पाणी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही झटपट अवघ्या ५ मिनिटांत ही रेसिपी बनवा.
लिंबू पाणी बनवण्यासाठी लिंबू, मीठ, साखर आणि पुदीन्याची पाने ही साहित्य एकत्र करा. सर्वात आधी लिंबू स्वच्छ धुवून त्याचे बारीक चार काप करा.
एका ग्लासमध्ये लिंबाचा रस मिक्स करा नंतर त्यात थोडी साखर आणि मीठ मिक्स करा. मिश्रणात पुदीना बारीक करून मिक्स करा आणि पाणी टाका.
संपूर्ण मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या म्हणजे लिंबू सरबत तयार होईल. तयार लिंबू सरबत थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा आणि नंतर सर्व्ह करा.