Siddhi Hande
रोज सकाळी नाश्त्याला काय बनवावं हा एक प्रश्न असतोच. नाश्त्याला काहीतरी पौष्टिक आणि चटपटीत खायला प्रत्येकालाच आवडतं.
तुम्ही घरीच ढाबा स्टाईल पंजाबी पनीर पराठा बनवू शकतात.
गव्हाचे पीठ, तेल, पाणी, पनीर, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मिरपूड, ओवा, आमचूर पावडर किंवा गरम मसाला, मीठ
सर्वात आधी तुम्हाला गव्हाच्या पीठात थोडं मीठ टाकायचं आहे. त्यात पाणी टाकून मऊ कणीक मळून घ्यायचे आहे.
यानंतर एका भांड्यात तुम्हाला पनीर किसून घ्यायचे आहे.
त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर आणि गरम मसाला, ओवा, आमचूर पावडर टाकून मिक्स करायचे आहे. यात मीठ टाका.
यानंतर पीठाचा गोळा करुन थोडा लाटून घ्या. यानंतर मध्यभागी पनीरचे सारण भरा.
याच्या कडा बंद करुन त्याचा गोळा करा. तुम्ही याचा पराठा लाटून घ्या.
यानंतर तवा गरम करुन त्यावर तूप किंवा तेल टाका. त्यावर पनीर पराठा खरपूस भाजून घ्या.