Pandharpur Latest News भारत नागणे
महाराष्ट्र

चंद्रभागेच्या जल शुद्धीकरणासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचा पुढाकार...

वारकरी संप्रदायामध्ये चंद्रभागा स्नानाला अनन्य साधारण महत्व आहे. येथे दररोज हजारो भाविक चंद्रभागेत स्नान करुन विठुरांयाचे दर्शन घेतात. आषाढी कार्तिकी यात्रेच्या वेळी तर लाखो भाविकांची चंद्रभागेत स्नानासाठी गर्दी होते.

भारत नागणे

पंढरपूर - येथील चंद्रभागा नदी पात्रातील पाणी शुद्धीकरणासाठी आर्ट आॅफ लिव्हिंगने पुढाकार घेतला आहे. यासाठी जागतिक स्तरावरील जल शुध्दीकरणाचे (Water purification) काम करणार्या "क्लीन सायन्स" या कंपनीची मदत घेतली जाणार आहे. या संदर्भात एक प्रकल्प तयार केला असून या कंपनीशी प्राथमिक स्तरावर चर्चा देखील झाली आहे, अशी माहिती आर्ट आॅफ लिव्हींगचे शेखर मुंदडा यांनी दिली. (Pandharpur Latest News)

चंद्रभागा नदी (Chandrabhaga River) पात्रातील चंद्रभागा मंदिराच्या जीर्णोद्धाराचे आर्ट आॅफ लि्व्हींग या संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे. यावेळी मुंदडा यांनी चंद्रभागाजल शुध्दीकरणा संदर्भातील अत्यंत महत्वाची आणि वारकऱ्यांच्या जिव्हाळ्याची माहिती दिली.

हे देखील पहा -

वारकरी संप्रदायामध्ये चंद्रभागा स्नानाला अनन्य साधारण महत्व आहे. येथे दररोज हजारो भाविक चंद्रभागेत स्नान करुन विठुरांयाचे दर्शन घेतात. आषाढी कार्तिकी यात्रेच्या वेळी तर लाखो भाविकांची चंद्रभागेत स्नानासाठी गर्दी होते. चंद्रभागा वाळवंट आणि पात्रातील पाण्याची स्वच्छता राखण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले. परंतु अद्याप कायम स्वरुपी तोडगा निघाला नाही. आजही वाळवंटात आणि नदी पात्रात अस्वच्छता आहे.

पात्रातील अस्वच्छ पाणी वारकरी भाविक आज ही तीर्थ म्हणून प्राशन करतात. चंद्रभागेतील पाणी कायमस्वरुपी शुध्द आणि स्वच्छ राहावे यासाठी आर्ट आॅफ लिव्हींग या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.याचाच एक भाग म्हणून जल शुध्दीकरण करणार्या क्लीन सायन्स कंपनीशी चर्चा केली असून या कंपनीने मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. चंद्रभागानदी पात्रातील पाणी शुध्दकरणाचा हा प्रयोग यशस्वी झाला तर देश भरातील लाखो भाविकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा पहिला धक्का; अनेक बड्या कंपन्यांनी उत्पादन थांबवलं, भारतावर बेरोजगारीचं संकट?

Cold Water Shower: थंड पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे माहितीये का?

Maharashtra Politics : मनसेला मोठं खिंडार, एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना धक्का

Mumbai Airport: मोठी बातमी! मुंबई विमानतळावरील नेटवर्क अचानक गंडलं; प्रवाशांचा उडाला गोंधळ

Maharashtra Live News Update: अंबरनाथमध्ये मनसेला पडणार खिंडार,माजी नगरसेविका अपर्णा भोईर शिवसेनेत करणार प्रवेश

SCROLL FOR NEXT