ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अंघोळ केल्याने फक्त शरीर स्वच्छ होत नाही तर मन देखील शांत होते, तसेच त्वचेवरील घाण बॅक्टेरिया निघून जातात.
थंड पाण्याने अंघोळ केल्याने कोणते आरोग्यदायी फायदे होतात, जाणून घ्या.
थंड पाण्याने अंघोळ केल्यास शरीरातील रक्ताभिसरण योग्यरित्या आणि सुरळीत होते.
थंड पाण्याने अंघोळ केल्यास शरीरातील सिंपथेटिक नर्वस सिस्टम स्टिम्युलेट होते. ज्यामुळे थकवा दूर होतो.
रोजच्या ताणतणावापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही थंड पाण्याने अंघोळे केली पाहिजे.
थंड पाण्याने अंघोळ केल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
जे लोक दररोज थंड पाण्याने आंघोळ करतात, त्यांचे मेटाबॉलिजम रेट वाढते यामुळे त्यांचे वजन हळूहळू कमी होऊ लागते.