औरंगाबादमध्ये नोकरीचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्याला अटक; 80 हजारांची फसणूक Saam TV
महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये नोकरीचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्याला अटक; 80 हजारांची फसणूक

साम टिव्ही ब्युरो

अविनाश कानडजे

औरंगाबादमध्ये कोरोना लसीचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. आता नोकरीचे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. घाटी रुग्णालयात बनावट नियुक्ती प्रमाणपत्र देऊन तरुणांची 80 हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन वर्षांपूर्वी घाटी रुग्णालयातील कर्मचारीच पैसे घेऊन नोकरीचे बनावट नियुक्ती पत्र देत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. आता देखील कर्मचाऱ्यानेच बनावट नियुक्तीपत्र दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी (Police) एका आरोपीला अटक केली असून, नोकर भरतीचा मोठा रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अब्दुल नाविद अब्दुल रशीद असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलर काम करणाऱ्या पठाण साबीर खान नासिर खान याला आरोपीने शासकीय घाटी रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून नोकरीला लावतो अशी थाप मारली होती. या आमिषाला साबीर बळी पडला. आरोपी नाविदने वेळोवेळी साबीर कडून 80 हजार रुपये घेतले आणि बनावट नियुक्तीपत्र दिले. मात्र अजून वेळ असल्याचे कारण देत ते कुणालाही दाखवू नको असे सांगितले. मात्र अनेक दिवस उलटूनही नियुक्ती मिळत नसल्याने साबीर ला संशय आला.

त्याने विचारपूस केली असता घाटी रुग्णालयात अशी कोणतीही भरती करण्यात आली नाही. आणि त्याला देण्यात आलेला नियुक्ती पत्र बनावट असल्याचे त्याला समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साबीरने बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता बेगमपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. आरोपीने आशा प्रकारे अनेकांना बनावट नियुक्ती पत्र दिल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. या मागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून, त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

KDMC News : पाणी मिळालं नाही, तर केडीएमसीला टाळे ठोकू; शिंदे गटातील नेत्याचा केडीएमसी अधिकाऱ्याला तंबी

Kalyan Crime : डिलिव्हरी बॉय, पण काम भयंकर, व्हिडिओ बघून सर्वच हैराण; CCTV पाहा

SCROLL FOR NEXT