Bhakri Tips: थंडीच्या दिवसात कोणती भाकरी ठरेल आरोग्यासाठी हेल्दी? फायदेही वाचा

Surabhi Jayashree Jagdish

भाकरी

हिवाळ्यात शरीराची उष्णता कमी होऊ नये, पचन चांगलं राहावं आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहावी यासाठी भाकरीची निवडही महत्त्वाची असते. थंड हवेमुळे शरीराला गरम, पौष्टिक आणि फायबरयुक्त आहाराची गरज असते.

हिवाळा

अशा वेळी काही खास प्रकारच्या भाकऱ्या शरीराला उब देतात. इतकंच नाही तर त्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. हिवाळ्याच्या दिवसात तुमच्या शरीरासाठी कोणत्या भाकरी फायदेशीर ठरतात ते पाहूयात.

ज्वारीची भाकरी

ज्वारी शरीराला उष्णता देते आणि हिवाळ्यातील थंडीपासून संरक्षण करते. ही भाकरी पचायला हलकी असून पोट फुगत नाही. फायबर जास्त असल्याने अपचन यापासून आराम मिळतो.

बाजरीची भाकरी

बाजरीमध्ये लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मुबलक असते, जे हाडं मजबूत ठेवतात. ही भाकरी शरीराला आतून उब देते, त्यामुळे हिवाळ्यात खूप फायदेशीर आहे.

नाचणीची भाकरी

नाचणीत कॅल्शियम आणि प्रोटीन जास्त असल्याने हिवाळ्यात शरीराची ताकद वाढते. सांधे दुखणे, थंडीमुळे होणारी कमजोरी यावर ही भाकरी उपयोगी ठरते.

मक्याची भाकरी

मक्याची भाकरी शरीरात उर्जा वाढवते आणि थंडीच्या दिवसांत कमजोरी जाणवत नाही. यात उपस्थित व्हिटॅमिन A आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचेला ग्लो देतात.

मल्टीग्रेन भाकरी

विविध धान्यांचं मिश्रण असल्यामुळे यात प्रोटीन, फायबर आणि व्हिटॅमिन्स मुबलक असतं. हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ही उत्तम भाकरी आहे.

तांदळाची भाकरी

तांदळाची भाकरी गरमागरम खाल्ल्यास शरीरात तात्काळ उष्णता निर्माण होते. पचायला अतिशय हलकी असल्याने हिवाळ्यात रात्री खायलाही योग्य असते.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी बोटं छाटल्यानंतर शाहिस्तेखान पुढं कुठे पळून गेला?

येथे क्लिक करा