Arrest the Raj thackeray a letter to the home minister from ex mla asif shaikh 
महाराष्ट्र

राज ठाकरेंना अटक करा; मालेगावच्या माजी आमदाराचं गृहमंत्र्यांना पत्र

Malegaon Latest News: पुण्याच्या पत्रकार परिषदेतील राज ठाकरेंचं वक्तव्य वादग्रस्त आणि चिथावणीखोर असल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्याची आसिफ शेख यांनी मागणी केली आहे.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

मालेगाव, नाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या मशिदीवरील भोंग्यांच्या भूमिकेबाबत अनेक मुस्लिम नेत्यांमध्ये नाराजी आहे. राज ठाकरेंवर (Raj Thackeray) गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी मालेगावचे (Malegaon) माजी आमदार आसिफ शेख (MLA Asif Shaikh) यांनी केली आहे. यासाठी त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांना आसिफ पत्र लिहिलं आहे. पुण्याच्या पत्रकार परिषदेतील राज ठाकरेंचं वक्तव्य वादग्रस्त आणि चिथावणीखोर असल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्याची आसिफ शेख यांनी मागणी केली आहे. (Arrest the Raj thackeray a letter to the home minister from ex mla asif shaikh from malegaon)

हे देखील पहा -

१६ एप्रिलच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे काय म्हणाले होते.

राज ठाकरे म्हणाले होते की, आज देशभरातल्या सर्वांना सांगणे आहे की भोंग्यांचा विषय हा धार्मिक विषय नाही तर हा सामाजिक विषय आहे. राज ठाकरे आपल्या भोंग्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेवरती ठाम आहेत. त्यांनी देशातील हिंदूंना तयार राहण्याचे आवाहन केले आहे. ३ तारखेपर्यंत रमजान असल्याने आम्ही काही करणार नाही. त्यानंतर आम्ही ज्या मशिदीवरती भोंगे वाजतील त्या मशिदीसमोर आम्ही आमच्या आरत्या लावणार असं राज ठाकरे म्हणाले होते. यावेळी राज ठाकरे यांनी २ मोठ्या घोषणा केल्या. 1 मे महाराष्ट्र दिनी राज ठाकरे औरंगाबाद येथे सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात जाहीर सभा घेणार आहेत. तर 5 जूनला आपल्या सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी पुण्यात केली.

राज ठाकरेंची मशिदीवरील भोंग्यांबाबत भूमिका:

मशिदीवरचे भोंगे खाली उतरवावे लागतील, मी धर्मांध नसून धर्माभिमानी असल्याचे म्हणत राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला. जर सरकारने मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे काम केले नाही तर आम्ही त्या मशिदींसमोर मोठमोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असे राज ठाकरे म्हणाले.

मशिदीवरचे भोंगे उतरवण्यास मालेगावच्या मौलवींचा नकार:

ऑल इंडिया इमाम काउन्सलिंगने मशिदीवरील भोंगे काढण्यास स्पष्ट नकार दिला आहे. अजान नमाजसाठी भोंगे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्या राजकीय स्वार्थासाठी राज ठाकरे हा वाद वाढवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अजान हा नमाजचाच एक अविभाज्य घटक आहे. त्याला वेगळं करता येणार नाही. त्यामुळे अजान होतच राहणार. राज ठाकरेंच्या भूमिकेला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. माईक आणि भोंगे मशिदीवरच राहतील. त्यांना कुणीही बाहेर काढू शकणार नाही", अशी भूमिका मौलानांनी घेतली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT