Narendra Bhondekar  Saam TV
महाराष्ट्र

Narendra Bhondekar : बागेश्वर बाबांना 4 वाजेपर्यंत अटक करा, अन्यथा कायदा व्यवस्था बिघडू शकते : आमदार नरेंद्र भोंडेकर

Bhandara News : धिरेंद्र शास्त्री यांना चार वाजेपर्यंत अटक करावी अन्यथा मोहाडी येथे येऊन त्यांना धडा शिकवणार असा इशारा आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Bhandara :

भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी येथे धिरेंद्र शास्त्री (बागेश्वर बाबा) यांचा सत्संग सुरू आहे. यामध्ये बागेश्वर बाबा यांनी मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्यावर टीका केली आहे. टीका करतानाचा त्यांचा व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्याने आता परमात्मा एक मंडळाचे असंख्य सेवक दुखावले गेलेत. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी देखील यावरून बागेश्वर बाबांना अटक करा, असं म्हटलंय.

बागेश्वर बाबांनी केलेल्या टिकेमुळे भंडारा जिल्ह्यातील शेकडो सेवकांनी रात्री मोहाडी पोलीस स्टेशन गाठत धिरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. तर 16 तास उलटुन देखील पोलिसांनी यावर कुठलीही कारवाही केली नाहीये.

काय म्हणाले होते बागेश्वर बाबा

तुम्हारे पूर्वज नर्क मे है तुम्हे भी नर्क मिलेंगा, असा उल्लेख बागेश्वर बाबांनी आपल्या वक्तव्यात केला आहे. त्यामुळे सर्वजण आक्रमक झालेत. धिरेंद्र शास्त्री यांना चार वाजेपर्यंत अटक करावी अन्यथा मोहाडी येथे येऊन त्यांना धडा शिकवणार असा इशारा आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priya Marathe: लाडक्या मैत्रीणीला शेवटाचा निरोप; अभिनेत्री प्रार्थना बेहेरेला अश्रू अनावर, हृदय पिळवटून टाकणारा क्षण, VIDEO

Padwal Curry Recipe : गावाकडे बनवतात तशी झणझणीत पडवळ करी, वाचा पारंपरिक रेसिपी

Pandharpur Temple: विठ्ठल मंदिरातील लाडू प्रसादाला बुरशी; पाकिटातून निघाल्या आळ्या

पोलीस इन्स्पेक्टरचा टोकाचा निर्णय; राहत्या खोलीत आयुष्य संपवलं; कुटुंबियांना वेगळाच संशय

Maratha Protest: मुंबईत मराठा आंदोलक आक्रमक; काही समुद्रात उतरले, VIDEO

SCROLL FOR NEXT