“An unforgettable moment as an army pilot proposes to his girlfriend after a proud graduation ceremony, blending duty with love.” saam tv
महाराष्ट्र

आईशप्पथ, भाऊ कसला रोमँटिक हाय ! हेलिकॉप्टरमधून उतरला, प्रेयसीला फिल्मी स्टाइलमध्ये केला प्रपोज; VIDEO व्हायरल

Army Pilot Proposing Girlfriend After Passing Out Parade: नाशिकमध्ये आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर एका वैमानिकाने आपल्या प्रेयसीला फिल्मी स्टाइलमध्ये हेलिकॉप्टरसमोर प्रपोज केल्याचा भावनिक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Omkar Sonawane

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये आज शिस्त, पराक्रम आणि आधुनिक विमानचलन कौशल्याचा भव्य संगम पाहायला मिळाला. दीक्षांत संचलन सोहळ्यात देशसेवेची शपथ घेत अनेक तरुण वैमानिक नव्या जबाबदाऱ्यांसाठी सज्ज झाले. पण या शिस्तबद्ध सोहळ्याला एका अनपेक्षित प्रेमळ क्षणाने खास रंग दिला.

प्रशिक्षण पूर्ण करून देशाच्या सेवेसाठी उड्डाण घेण्यास सज्ज झालेली भारत भारद्वाज यांनी आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवातही याच क्षणी करण्याचा निर्णय घेतला. सोहळा संपताच, हेलिकॉप्टरच्या साक्षीने ज्याने त्यांच्या स्वप्नाना पंख दिले, भारत यांनी सर्वांसमोर आपल्या प्रेयसी आरुषीसमोर गुडघ्यावर बसत प्रेमाची कबुली दिली.

हातात अंगठी, डोळ्यांत स्वप्न आणि ह्रदयात देशसेवेइतकंच प्रामाणिक प्रेम.. या क्षणी वेळ जणू थांबली होती. उपस्थित अधिकारी, कुटुंबीय आणि मित्रमंडळी हा अविस्मरणीय क्षण अनुभवत स्तब्ध झाले. आरुषीने हसतमुखाने हा प्रस्ताव स्वीकारताच परिसर टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला.. आणि त्या टाळ्यांमध्ये फक्त एका प्रेमकथेची सुरुवात नव्हती, तर देशसेवेच्या शपथेसोबत प्रेमाचीही नवी शपथ गुंजत होती.

कर्तव्य आणि प्रेम दोन्ही एकाच वेळी जपणाऱ्या या सुंदर क्षणाने उपस्थित प्रत्येकाच्या मनात कायमचे स्थान मिळवले, कारण हा फक्त एक प्रपोजल नव्हता, तर दोन हृदयांच्या उड्डाणाची सुरुवात होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CIDCO Lottery: नवी मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार, सिडकोच्या ४,७७९ घरांसाठी लॉटरी, कुठे किती घरं अन् सोडत कधी निघणार?

Shiv Sena Live Update : १९ जुलैला निवडणूक आयोगाकडे कोणता पुरावा होता?; सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा आयोगाला थेट सवाल

Thigh size: जाड मांड्या असलेल्या व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी?

डायबिटीजच्या रुग्णांनी जेवल्यानंतर १० मिनिटे का चालावे? कारण जाणून घ्या

Maharashtra News Live Update : घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७ वर पोहचला

SCROLL FOR NEXT