Kolhapur Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur News: तरूण उद्योजकानं पत्नी आणि मुलासह संपवलं जीवन; बेडरूममध्ये आढळले तिघांचे मृतदेह

Gadhinglaj News: तरूण उद्योजकानं कुटुंबासह जीवन संपवण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती.

Shivani Tichkule

रणजित माजगावकर

Kolhapur News Today: गडहिंग्लज शहरातील उद्योगपती संतोष शिंदे यांनी आपल्या पत्नी व मुलासह आज राहत्या घरी जीवन संपवल्‍याचे निदर्शनास आले. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. त्या आरोपांमध्ये त्यांना जवळपास महिनाभराची जेलवारी करावी लागली होती. त्यानंतर ते ताणतणावात होते. त्यानंतर आज सकाळी त्यांनी आपल्या पत्नी व मुलासह विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. (Latest Marathi News)

संतोष शिंदे यांनी अर्जुन उद्योग समूहाची स्थापना केली होती. या अंतर्गत तेल उत्पादन, व्यायाम शाळा, बेकरी उत्पादने यासह विविध प्रकारची उत्पादने तसेच महाराष्ट्रासह (Maharashtra) मुंबई, कर्नाटकामध्येही त्यांनी उद्योग विस्तारला होता. शुक्रवारी रात्री त्यांनी राहत्या घरी पत्नी मुलासह जीवन संपवले.

आज सकाळी ते बेडरूमचा दरवाजा उघडत नसल्याने त्यांच्या आईने अन्य शेजाऱ्यांना बोलवले असता दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर बेडरूममध्ये तिघांचे मृतदेह आढळले. यावेळी त्यांच्या मानेवर जखमा आढळल्या प्राथमिक अंदाजानुसार सुरुवातीला विष पिऊन व त्यानंतर गळ्यावर सुरी फिरवून घेऊन त्‍यांनी जीवन संपवल्‍याचे लक्षात येते. घटनास्थळी गडहिंग्लज पोलिसांनी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे. (Kolhapur News)

गडहिंग्लज बंदचे आवाहन

दरम्यान, संतोष शिंदे यांनी कुटुंबासह आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. शहरातील ज्या महिलेने शिंदे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दिली तिचे व तिच्या साथीदाराचे नाव या चिठ्ठीत लिहून त्यांच्यामुळे आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. त्यांना अटक केल्याशिवाय मृतदेह हलवू नये अशी भूमिका नागरिकांनी घेतली. शहरातून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी फेरी मारून बंदचे आवाहन करत त्या दोघांना अटक करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT