arjun kharat made vehicle from wastage material saam tv
महाराष्ट्र

Sangli: भंगारातील साहित्यातून अर्जुनने बनवली ट्राम गाडी

विश्रामबाग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रताप लाड व शाळेच्या शाळा अधीक्षिका लाड यांचेही अर्जुनला मार्गदर्शन लाभले.

विजय पाटील

सांगली : सांगलीतील (Sangli) शिक्षण संस्थेच्या विश्रामबाग माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या (student) अर्जुन शिवाजी खरात (arjun kharat) याने भंगारातील साहित्यातून चक्क चारचाकी प्रदूषणविरहित ट्रामगाडी बनवली आहे. त्याची ट्राम गाडी पाहण्यासाठी नागरिक त्याच्याकडे जात आहेत. (Sangli Latest Marathi News)

Arjun Shivaji Kharat Along With His Vehicle

काेराेनाचा (coronavirus) प्रादुर्भाव वाढला आणि संपुर्ण देश लॉकडाऊनच्या (lockdown) छायेत गेला. या काळात अर्जुनच्या घराचे बांधकाम सुरू होतं. अर्जुनने ग्रीलचे भंगार (वेस्टेज) साहित्य जमवले आणि त्याचे वेल्डिंग करून 'सनी मोपेडचे इंजिन', मारुती वाहनाचे स्टेरिंग आणि सायकलची चार चाके जोडून गाडी बनवली. पहिल्या प्रयत्नात त्यास फारसे यश आले नाही.

Arjun Shivaji Kharat

त्यानंतर त्याने इनोव्हेशन करायचं ठरवलं. मारुतीचे स्टेरिंग आणून स्टेरिंग रॅक जोडला मागच्या बाजूला स्प्लेंडरचे शॉकप्सर बसवले. सायकलच्या चाकाच्या ऐवजी सनी मोपेडची चाके बसवली. मागच्या बाजूला एक्सेल बार लावले. मध्यभागी चीन वेल बसवले, मोपेडचे ड्रम वेल लावले मग गाडी चालवून बघितली. पण तोही प्रयत्न फसला, मग गाडीचं वजन कमी केलं आणि आशेचा किरण दिसला, गाडी चालायला लागली. मग त्याने बॉडीच्या कव्हरसाठी पत्रे लावले. त्यानंतर सहा-सात महिने असेच गेले तोपर्यंत इंजिन खराब झाले होते.

अर्जुनला समजलं शाळेत विज्ञान प्रदर्शन आहे. 'प्रदूषण विरहित' इलेक्ट्रिक वर चालणारी गाडी करण्याचं त्याने ठरवलं. त्याने त्याच्या वाहनास ४८ वॅाल्टची डीपी मोटार बसवली, बारा वॅटच्या चार बॅटरी बसवल्या. बाकीचं सेटिंग डिझाईन त्यानेच केलं आणि शेवटी ट्रामगाडी तयार झाली.

ही गाडी ४८ वॅट बॅटरीवर पंधरा किलोमीटर चालते. माझ्या कुटुंबीयांचे वेळोवेळी मला सहकार्य मिळाले. या कामासाठी शाळेतील व्यवसायिक शिक्षणाच्या शिक्षकांचे वेळोवेळी मार्गदर्शन झाले तसेच विश्रामबाग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रताप लाड व शाळेच्या शाळा अधीक्षिका लाड मॅडम यांचेही मला मार्गदर्शन लाभले असे अर्जुनने साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : दुपारी उन्हाचा चटका, पहाटे गारठा, वाचा राज्यातील हवामानाचा अंदाज

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT