jalna accident news  saam tv
महाराष्ट्र

अर्जुन खोतकरांच्या ताफ्यामधील वाहनांचा भीषण अपघात; परवानगी नसताना केला समृद्धी महामार्गाचा वापर

समृद्धी महामार्गावर अर्जून खोतकर यांचे फलक असलेल्या १० वाहने एकमेकांवर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Jalna News Update : शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळे पक्षात दोन गट पडले आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून शिवसेनेवर (Shivsena) दावा करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही गटाने दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. या शिंदे गटाच्या नेत्यांकडून दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्या समर्थकांचा ताफा थेट समृद्धी महामार्गांवरूनचा दसरा मेळाव्यासाठी निघाला आहे. याच महामार्गावर अर्जून खोतकर यांचे फलक असलेल्या १० वाहने एकमेकांवर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे.

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी जालन्यातून ५०० वाहनांचा ताफा मुंबईडे रवाना झाला आहे. शिंदे गटाचे उपनेते अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली हा वाहनांचा ताफा मुंबईकडे निघाला. मात्र, मुंबईकडे हा वाहनांचा ताफा समृद्धी महामार्गावरून उद्घाटनाआधीच निघाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दसरा मेळाव्याला जाण्यासाठी जालन्यातील अर्जुन खोतकर समर्थकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याचदरम्यान, अर्जुन खोतकर समर्थकांचा ताफ्याचा अपघात झाला आहे.

दरम्यान, औरंगाबाद-दौलताबाद दरम्यान समृद्धी महामार्गांवरून जात असताना शिंदे गटाच्या वाहनांचा अपघात झाला आहे. अपघात झालेल्या वाहनांच्या काचेवर एकनाथ शिंदे आणि अर्जुन खोतकर यांचे फलक असलेल्या १० वाहन एकमेकांवर धडकल्या आहेत. या अपघातात वाहनांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, जीवितहानी आणि जखमी झाल्याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. तसेच उद्घाटनाआधीच समृद्धी महामार्गाचा वापर केल्यामुळे शिंदे गटाला टीकेला सामोरे जावे लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त नांदेड शहरातील श्री नरहरी नरसिंह मंदिरात विठ्ठल नामाचा गजर

Pune: पंढरीच्या वाटेवर लुटमार अन् अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; पोलिसांनी २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

SCROLL FOR NEXT