Arjun Khotkar, mla kailash gorantyal, vikram zol, vijay zol, jalna saam tv
महाराष्ट्र

Vijay Zol News : लोकांचे बुडालेले पैसे द्या अन्यथा तुमच्या घरावर मोर्चा काढू; काॅंग्रेस आमदारांना इशारा

क्रिप्टो करन्सीत ज्यांचे पैसे बुडाले त्या लोकांचे पैसे आमदारांनी द्यावे अशी मागणी खाेतकरांनी केली आहे.

लक्ष्मण सोळुंके

Arjun Khotkar Latest News : जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल (mla kailash gorantyal) यांना अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) नावाची कावीळ झाली आहे. क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून पाचशे कोटींचा घोटाळा झाला. यातून या महाशयाला किती मिळाले याची चौकशी झाली पाहिजे तसेच संशयितांना पाठीशी घातल्याप्रकरणी आमदारावरच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी अर्जुन खाेतकर (arjun khotkar) यांनी केली आहे. दरम्यान माझ्या जावयावर केले जाणारे आरोप खोटे असल्याचे खाेतकरांनी नमूद केले.

अर्जुन खोतकर यांचे जावई माजी क्रिकेटपटू विजय झोल (Vijay Zol) आणि त्याचा भाऊ विक्रम (vikram zol) याच्यासह पंधरा ते वीस जणांवर उद्योजक किरण खरात यांच्या तक्रारीनंतर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उद्याेजकास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जालना येथील घनसावंगी पोलिस (police) ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खाेतकर म्हणाले संताजी आणि धनाजी जसे विरोधकांना दिसायचे तसे खोतकर आणि झोल आमदारांना जेवताना, झोपताना दिसत आहेत. जिल्ह्यात क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून अंदाजे पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून यामध्ये या महाशयाला काही भेटले आहे का, याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी पोलिसांकडे करणार असल्याचे खोतकरांनी नमूद केले.

त्याशिवाय संशयित आरोपींना पाठीशी घालणाऱ्या गोरंटयाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही खोतकरांनी केली आहे. क्रिप्टो करन्सीमध्ये ज्या लोकांचे पैसे बुडाले आहे. त्या लोकांचे पैसे आमदारांनी द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

लोकांचे बुडालेले पैसे आणून द्या अन्यथा तुमच्या घरावर मोर्चा (morcha) काढू असा इशारा देखील खोतकरांनी आमदार गोरंटयाल यांना दिला आहे. आमदारांनी हा विषय माझ्या परिवारापर्यत नेला असून एवढ्या खालच्या थराला कधी गेलो नाही. माझ्या जावयाचे आणि किरण खरात यांचे चांगले संबंध असून माझ्या जावयाने एवढ्या अडचणीच्या काळातही किरण खरातला पैशांची मदत केली. त्यांच्यातील व्यवहार देखील पारदर्शक झाला असंही खोतकर यांनी स्पष्ट केलं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT