#परीक्षांचाधंदाथांबवा : डोकं असलेला आरोग्य मंत्री नियुक्त करा; भाजयुमोची मागणी कैलास चौधरी
महाराष्ट्र

#परीक्षांचाधंदाथांबवा : डोकं असलेला आरोग्य मंत्री नियुक्त करा; भाजयुमोची मागणी

आरोग्य विभागातील 'क' आणि 'ड' वर्गाच्या परिक्षा अचानकपणे रद्द केल्यामुळे भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध व्यक्त केला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद : आरोग्य विभागातील 'क' आणि 'ड' वर्गाच्या परिक्षा अचानकपणे रद्द केल्यामुळे भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांना आर्थिक मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याने, महाविकास आघाडी सरकार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी केली आहे.

हे देखील पहा-

महाविकास आघाडी सरकारने डोकं असलेला आरोग्यमंत्री नियुक्त करावा, तसेच विद्यार्थ्यांचे झाले असलेले आर्थिक नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी या आंदोलनात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. परीक्षार्थी उमेदवार परीक्षा केंद्रावर पोहोचल्यापूर्वीच आरोग्यमंत्र्यांनी ट्विट करत परीक्षा रद्द करण्यात आली असल्याचे सांगितल्याने विद्यार्थी आणि भाजपाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

यामुळे ऐनवेळी आरोग्य विभागाची भरती परीक्षा रद्द झाल्याने परीक्षेसाठी जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. काहींना रेल्वे स्टेशनवर तर आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यातील विद्यार्थी परीक्षेसाठी मोठ्या आशेने आले होते. मात्र, ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना रेल्वे स्टेशनवर आणि बस स्थानकवरती रात्र काढावी लागली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Video : माकडीण दारूच्या दुकानात गेली, व्होडकाची बाटली फोडली अन् घटाघटा प्यायली, नंतर जे घडलं ते पाहून सगळेच शॉक

Siddharth Jadhav: रहस्यमय प्रवास अन् निस्सीम भक्ती; 'बजरंगी'मधील सिद्धार्थ जाधवचा जबरदस्त लुक पाहिलात का?

Guava vs Banana: पेरू की केळी? कोणतं फळ खाल्ल्याने मिळतं जास्त पोषण

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरेंची विजयकुमार घाडगेंच्या उपोषणाला भेट

Chikankari Kurti Designs: महिलांसाठी चिकनकारी कुर्तीचे 5 युनिक डिझाईन्स; ऑफिस आणि डेलीवेअर लूकसाठी एकदम परफेक्ट

SCROLL FOR NEXT