बीडमध्ये पोलिसाला लाच घेताना रंगेहाथ पकडलं
नेकनुर पोलिस ठाण्यातील पोलिस अमलदाराला अटक
शेतकऱ्याकडून १० हजारांची लाच घेताना पकडलं
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बीडमध्ये मोठी कारवाई केली
बीडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पोलिसाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. अपघातामध्ये मयत झालेल्या वडिलांच्या विम्याच्या दाव्यासाठी कागदपत्र देण्यासाठी १५,००० रुपयांच्या लाचेची मागणी करून १०,००० रुपये स्वीकारताना पोलिस अमलदाराला रंगेहाथ पकडण्यात आलं. बीडचा ऐकणार पोलिस ठाण्यामधील अमलदार दत्तात्रय बळवंतला जालना अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. यामुळे बीड पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतर बीडमध्ये लाचखोरीच्या घटना थांबणार कधी? असा सवाल उपस्थित होत आहे. याच वादग्रस्त दत्तात्रय बळवंत यांनी एका शेतकऱ्याच्या मुलाला 'तुझे कॅरेक्टर खराब करून टाकीन.', अशी धमकी दिली होती त्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. एका अपघातात तक्रारदाराचे वडील मयत आहेत. त्यांचा विम्याचा दावा कोर्टात करण्यासाठी पोलिस स्टेशनकडून दिले जाणारे कागदपत्र मिळावे यासाठी तक्रारदाराने वारंवार मागणी केली.
यावेळी कागदपत्र देण्यासाठी १५००० रुपयांची मागणी केली. तडतोडअंती १०००० रुपये देण्याचे ठरले. १०००० रुपयांची लाच आज स्वीकारताना बळवंतला रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे. अटक करण्यात आलेला हा कर्मचारी यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.
काही महिन्यांपूर्वी पवनचक्की लाईन उभारणी करत असताना शेतीच्या कारणावरून झालेल्या वादात संबंधित अंमलदार एका शेतकऱ्याच्या मुलास तुझे 'कॅरेक्टर खराब करून टाकीन', अशी धमकी देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या घटनेनंतरही त्याच्या वर्तणुकीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आता लाच स्वीकारताना झालेल्या कारवाईमुळे पुन्हा एकदा नेकनुर पोलिस ठाणे चर्चेत आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.