Manoj Jarange patil hunger strike Saam TV
महाराष्ट्र

Antarwali Sarati : अंतरवाली सराटीत वारं फिरलं, मनोज जरांगेंच्या उपोषणाला सरपंचांसह अनेकांचा पाठिंबा; आता पुढे काय?

Manoj Jarange Patil News : अंतरवाली सराटीतील वारं फिरलं आहे. सरपंचासह ५ ग्रामपंचायत सदस्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे.

Satish Daud

मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा उपोषण करण्यास परवानगी देऊ नका, असं निवेदन अंतरवाली सराटी गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं. या निवेदनावर गावातील काही नागरिकांच्या सह्या देखील होत्या. त्यानंतर पोलिसांनी जरांगे यांच्या उपोषणाला परवानगी नाकारली. मात्र, आता अंतरवाली सराटीतील वारं फिरलं आहे. सरपंचासह ५ ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या उपोषणाला पाठींबा दर्शवला आहे.

त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा कायदेशीर मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे.

येत्या ४ जूनपासून मी आमरण उपोषण करणार असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, त्यांच्या उपोषणाला अंतरवाली सराटी येथील उपसरपंच आणि ५ ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध केला होता. आंदोलनामुळे गावात जातीय तेढ निर्माण होऊ शकतं.

तसेच ग्रामपंचायतच्या कामांना अडथळा आणि महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास होऊ शकतो, उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी म्हटलं होतं. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलं होतं. या निवेदनावर अनेकांच्या सह्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी जरांगे यांच्या उपोषणाला परवानगी नाकारली होती.

तरीही जरांगे उपोषणावर ठामच आहे.गावातील काही लोकांना हाताशी धरून सरकार षडयंत्र रचत आहे, असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला अनुसरून आज अंतरवाली सराटी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीची विशेष बैठक बोलावली. यावेळी मतदान देखील घेण्यात आलं.

तेव्हा मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या बाजूने ५ सदस्यांनी मतदान केलं. तर इतर ५ सदस्यांनी त्यांच्या उपोषणाला विरोध केला. यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे यांच्या उपोषणाला अखेर पाठिंबा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यामुळे त्यांच्या उपोषणासाठीची प्रशासकीय अडचण दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता पोलीस याबाबत नेमकी काय भूमिका घेणार? हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT