Manoj Jarange Patil March Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange : अंतरवाली सराटी आंदोलन प्रकरणात गंभीर गुन्हे मागे घेणार?

Manoj Jarange Patil News : अंतरवली सराटी आंदोलनातील 200 पेक्षा अधिक आंदोलकांवर गंभीर गुन्हे आहेत. हे गुन्हे मागे घेण्यास अडचण असल्याचे गृह विभागाच्या अहवालात स्पष्ट झालेय. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत उपसमिती करणार चर्चा

Namdeo Kumbhar

अंतरवाली सराटीत 2 वर्षांपूर्वी मराठा आंदोलनाच्या वेळी झालेल्या दंग्यामध्ये 200 पेक्षा अधिक मराठा आंदोलकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे मागे घेतले जावेत यावर मंगळवारी मराठा उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र हे गुन्हे अत्यंत गंभीर असल्यानं ते मागे घेण्यात अडचणी असल्याचे गृह विभागानं यासाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवालात नमूद केलं असल्याचं समजतं. हे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी उपसमिती चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपसमिती आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. चर्चेला तयार आहे, पण ही चर्चा बंदी खोलीत होणार नाही. सर्वांसमोरच चर्चा होईल, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे पाटील आज सकाळी दहा वाजता मुंबईकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत शेकडो गाड्या आणि हजारो मराठा सोबत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रात 21 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे झाली नियुक्ती?

Rashi Bhavishya: वैशाख पौर्णिमेला करिअर अन् पैशांत होणार मोठी वाढ, या राशींचे नशीब चमकणार; वाचा शुक्रवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रातील माणसाने फक्त मराठीमध्ये बोलावं - राज ठाकरे

Supriya Sule: यापुढे पवारांविरोधात लढणार नाही, दुसरा मतदारसंघ शोधेन; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

Raj Thackeray Speech : राजकीय नेत्यांमुळं महाराष्ट्राचं वाटोळं; राज ठाकरेंचा जोरदार प्रहार

SCROLL FOR NEXT