Amit Deshmukh Saam TV
महाराष्ट्र

पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडून लातूरच्या सांस्कृतिक क्षेत्राला आणखी एक भेट

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने लातूर येथे २६ ते २८ मार्च दरम्यान लावणी महोत्सवाचे आयोजन

दीपक क्षीरसागर

लातूरच्या सांस्कृतिक क्षेत्राला उभारी देण्यासाठी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख Amit Deshmukh) यांच्या पूढाकारातून आणखी एक भेट मिळाली आहे. दि. २६ ते २८ मार्च दरम्याने लातूर (Latur) येथे सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

काही दिवसा पूर्वी सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने राज्यभरात नाटय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या नाटय स्पर्धेचे केंद्र लातूरला सुरू केल्यामूळे असंख्य नाटय कलावंतानी आपली कला येथे सादर केली. शिवाय येथील रसीकांनी नाटकांचा आनंद घेतला.

हे देखील पहा -

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या अभिनव कल्पनेतून आता आजादी का अमृत महोत्सवांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासनातर्फे राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम व महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून लातूर येथे लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.लावणी ही महाराष्ट्रांची पारंपरिक लोककला असून आजही जनसामान्या आपली वाटते. शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत लावणी फार मोठ्या प्रमाणात प्रसिध्द आहे. ग्रामीण भागातील रसिक प्रेक्षकांचे आजही या कलेच्या माध्यमातून मनोरंजन होत असते.

आधुनिक युगात लोप पावत चाललेल्या लोककलांचे जतन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने तसेच समृद्ध लोककलेला व लोककलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी लावणी महोत्सव दिनांक 26 मार्च ते 28 मार्च 2022 या कालावधीत लातूर येथील स्व. दगडोजीराव देशमुख सांस्कृतिक सभागृह, कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३ लाख ५१ हजार शेतकरी पात्र, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

SCROLL FOR NEXT