विदर्भात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का.
माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे भाजपमध्ये प्रवेश करणार.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा.
भाजपला मोर्शी व वरुड परिसरात संघटनात्मक फायदा होण्याची अपेक्षा.
Vikram Thakre from Morshi constituency to join BJP before local polls: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी काँग्रेसला लागलेली गळती काही थांबायचे नाव घेत नाही. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातही काँग्रेसला जोरदार हादरे बसत आहे. काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या विदर्भात आता मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसचे मोर्शी मतदारसंघाचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी नुकतीच भाजप नेत्याची भेट घेतल्याचे समोर आलेय. (Vidarbha Congress faces setback as ex-MLA’s son defects to BJP)
काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे भाजपच्या संपर्कात आहेत. शनिवारी वरुड येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत विक्रम ठाकरे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत विक्रम ठाकरे यांना महाविकास आघाडने उमेदवारी दिली नव्हती, त्यामुळे ते नाराज होते. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.
विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या शनिवारी वरुड येथे आयोजित कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत विक्रम ठाकरे भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत. या कार्यक्रमाला स्थानिक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत विक्रम ठाकरे यांना महाविकास आघाडीने उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. त्यांच्या या निर्णयामुळे ते काँग्रेसपासून काहीसे दूर गेले होते. अलीकडील काही महिन्यांपासून ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू होती, आणि अखेर ती सत्यात उतरणार आहे.
विक्रम ठाकरे यांच्या प्रवेशामुळे मोर्शी आणि वरुड मतदारसंघात भाजपची संघटनात्मक ताकद वाढेल, अशी अपेक्षा भाजप नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, काँग्रेसला मात्र या घडामोडीमुळे मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, ठाकरे कुटुंबाचा स्थानिक राजकारणात प्रभाव असून, विक्रम ठाकरे यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला आगामी निवडणुकांमध्ये मोर्शी परिसरात लाभ होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.