Padma Awards  SaamTvNews
महाराष्ट्र

Padma Awards : डॉ.प्रभा अत्रेंना पद्मविभूषण; श्रीगुरु डॉ.बालाजी तांबेंना पद्मश्री जाहीर

आज पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून देशभरातून विविध क्षेत्रातल्या 128 दिग्गजांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १० जणांचा समावेश आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून अतिशय प्रतिष्ठित आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची (Padma Awards) घोषणा करण्यात आली आहे. देशभरातून विविध क्षेत्रातल्या 128 दिग्गजांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

हे देखील पहा :

महाराष्ट्रातून एकूण १० जण पद्म पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्री जाहीर झाला आहे. वैद्यक क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. श्रीगुरु बालाजी तांबे यांनी आयुर्वेद आणि योग शिक्षणाच्या माध्यमातून वैद्यक क्षेत्रासाठी मौल्यवान कामगिरी केली. सकाळ वृत्तपत्राच्या ‘फॅमिली डॉक्टर’ या पुरवणीच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य विषयक जागृती केली. ऑगस्ट २०२१ मध्ये श्रीगुरु तांबे यांनी वयाच्या ८१ व्या अखेरचा श्वास घेतला. डॉ. तांबे यांच्यासह जनरल बीपीन रावत, राधेशाम खेमका आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनाही मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्रातील ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण तर सायरस पुनावाला यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

पद्म पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील मानकरी :

पद्मविभूषण

प्रभा अत्रे

पद्मभूषण

सायरस पुनावाला
नटराजन चंद्रशेखरन

पद्मश्री

विजयकुमार डोंगरे
डॉ. हिम्मतराव बावस्कर
सुलोचना चव्हाण
सोनू निगम
अनिल कुमार राजवंशी
बालाजी तांबे (मरणोत्तर)
भिमसेन सिंघल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

YouTube Ban: 'या' देशात १६ वर्षांखालील मुलांवर यूट्यूब बंदी, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: - प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयात हजर केलं जाणार

Ind vs Eng 5th Test : बुमराह, पंत आणि शार्दुल बाहेर; पाचव्या कसोटीत कुणाला मिळाली संधी, अशी आहे भारताची प्लेईंग ११

Malegaon Blast Case : दहशतवाद कधीच भगवा नव्हता; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर मुख्यमंत्र्यांसहित कोण काय म्हणालं?

sakhee Gokhale: अभिनेत्री सखी गोखलेबद्दल या गोष्टी कोणालाच माहित नाही

SCROLL FOR NEXT