बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी आरोप पत्र दाखल केलंय. या प्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेले वाल्मीक कराड मुख्य आरोपी आहेत. आरोप पत्र दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठी मागणी केलीये. दमानिया काय मागणी करतायत पाहया...
ऐकलंत...सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी थेट सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीची मागणी केलीये...तुकाराम मुंढें कोण पाहूयात...
तुकाराम मुंढेंवर बीडची जबाबदारी?
तुकाराम मुंढे धडाडीच्या कामामुळे प्रसिद्ध
राजकीय नेत्यांसोबत सातत्याने खटके
कर्मचाऱ्यांना कडक शिस्त लावणारा अधिकारी
सर्वाधिक बदली होणारा अधिकाऱी म्हणूनही ओळख
मुंढेंकडे 2020 मध्ये नागपुरच्या आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी मविआ सरकार सत्तेवर होतं. मात्र तिथूनही त्यांची उचलबांगडी करण्यात आली.. मुंढे मुळातच राजकारण्यांचे नावडते असल्याची चर्चा नेहमीच रंगते.अशातच बीडमध्ये सुरु असलेला गुंडा राज मुंढेंच्या नियुक्तीनं कंट्रोलमध्ये येणार का ? दुसरीकडे पालकमंत्री अजित पवार मुंढेंची नियुक्ती होऊ देणार का?
त्यासाठी अंजली दमानियांच्या मागणीनुसार तुकाराम मुंढेंकडे सरकार बीडचा चार्ज देणार का हेच बघायचं?
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.